उपराष्ट्रपती कार्यालय

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा

Posted On: 14 OCT 2021 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  14 ऑक्टोबर 2021

उपराष्ट्रपती श्री एम.व्यंकय्या नायडू यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे-

दसऱ्याच्या शुभ प्रसंगी मी माझ्या देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि शुभकामना व्यक्त करतो.

देशभरात पारंपरिक उल्हास आणि उत्साहाने साजरा केला जाणारा दसरा 'वाईटावर' 'चांगल्याचा' विजय याचे प्रतीक आहे. हा सण आपल्याला श्रीरामाच्या धर्मनिष्ठ, सद्गुणी आणि उदात्त जीवनाचे स्मरण करून देतो आणि त्यांनी  दाखवलेल्या नीतिमत्तेच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो.

सातत्याने आसुरी शक्तींना दूर करून आणि चांगुलपणा आणि सौहार्द वाढवणे आवश्यक असल्याचे स्मरण आपल्याला करून देणारा दसरा हा सण आहे. माझी मनोकामना आहे की, दसऱ्याचा सण आपल्या देशात शांती, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो.

 

S.Tupe/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1763914) Visitor Counter : 231