संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

अमेरिकेचे नौदल प्रमुख एडमिरल माइकल गिल्डे भारत दौऱ्यावर

Posted On: 12 OCT 2021 5:23AM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 ऑक्टोबर 2021

 

अमेरिकेचे नौदल प्रमुख  एडमिरल माइकल गिल्डे 11 ते 15 ऑक्टोबर 21 दरम्यान पाच दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर आहेत. या  दौऱ्यात , ऍडमिरल  गिल्डे नौदल प्रमुख ऍडमिरल  करमबीर सिंह यांच्याशी संवाद साधतील. तसेच भारत सरकारच्या इतर उच्च अधिकाऱ्यांचीही भेट घेतील.  ऍडमिरल  गिल्डे भारतीय नौदलाच्या  मुंबई येथील पश्चिम क्षेत्र मुख्यालय ) आणि  विशाखापट्टणम येथील पूर्व क्षेत्र मुख्यालय याला भेट देणार असून संबंधित कमांडर-इन-चीफशी संवाद साधतील. ऍडमिरल  गिल्डे हे भारतीय शिष्टमंडळासह भारताच्या पूर्व किनारपट्टीवरस्थित  अमेरिकी विमानवाहू नौका  स्ट्राइक  वरही जाणार आहेत.

भारत आणि अमेरिकेदरम्यान पारंपरिक घनिष्ठ आणि  मैत्रीपूर्ण संबंध राहिले  आहेत. दोन्ही देशांदरम्यान  संरक्षण संबंध परस्पर विश्वास आणि भरवशाचे आहेत आणि जून 2016 मध्ये भारताला  प्रमुख 'संरक्षण भागीदार दर्जा' प्रदान केल्यानंतर ते अधिक मजबूत झाले आहेत. याशिवाय, दोन्ही देशांनी काही मूलभूत करार  केले आहेत, ज्यात 2015  मध्ये स्वाक्षरी केलेला संरक्षण व्यवस्था कराराचा  समावेश आहे. जो दोन्ही देशांच्या संरक्षण आस्थापनांमध्ये सहकार्यासाठी  एक  रूपरेषा  प्रदान करतो.  2016 मध्ये स्वाक्षरी केलेला लॉजिस्टिक एक्सचेंज सामंजस्य करार (LEMOA),  दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमध्ये परस्पर रसद सहाय्य सुविधा पुरवणारा  मूलभूत करार आहे. 6 सप्टेंबर  2018 रोजी स्वाक्षरी केलेला कम्युनिकेशन्स कॉम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी  करार (COMCASA)  दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमध्ये माहितीची देवाणघेवाण  सुलभ करते आणि अलीकडेच, मूलभूत विनिमय सहकार्य करार (BECA)  करण्यात आला जो संरक्षण मंत्रालय आणि अमेरिकेच्या  राष्ट्रीय  भू-स्थानिक एजेंसी (एनजीए) दरम्यान भू -स्थानिक माहिती सामायिक करण्यास सक्षम करतो.

भारतीय नौदल अनेक मुद्यांव अमेरिका नौदलाबरोबर सहकार्य करत आहे. ज्यात  मालाबार आणि  रिमपैक कवायती सारखे परिचालन संबंधी सहकार्य, प्रशिक्षण आदान-प्रदान, वाणिज्यिक जहाजांबाबत माहितीचे  आदान-प्रदान आणि विविध क्षेत्रातले  विषय तज्ज्ञ, या सर्वांचा समन्वय दरवर्षी आयोजित कार्यकारी सुकाणू गट (ईएसजी) बैठकांच्या माध्यमातून  साधला जातो. याशिवाय  दोन्ही नौदलांच्या युद्धनौका नियमितपणे एकमेकांच्या बंदरांवर पोर्ट कॉल  करतात. दोन्ही नौदल ‘मुक्त, खुल्या  आणि सर्वसमावेशक हिंद -प्रशांत क्षेत्राच्या ' सामायिक उद्दिष्टासह सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधण्याच्या  दिशेने  सहकार्य करत आहेत.

 

 Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1763264) Visitor Counter : 236