इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"महिला आणि मुलींसाठी सायबर सुरक्षा" या वेबिनारने राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग आणि यूएन वूमेन इंडिया यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस केला साजरा

Posted On: 11 OCT 2021 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑक्टोबर 2021

 

आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा दिनानिमित्त महिनाभर चालणाऱ्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता उत्सवानिमित्त सायबर सुरक्षेच्या जागतिक गरजा लक्षात घेऊन आणि सायबर स्वच्छतेचे महत्त्व मान्य करून, राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग (एनईजीडी) आणि यूएन वुमन इंडिया यांनी आज संयुक्तपणे "महिला आणि मुलींसाठी सायबर सुरक्षा" या विषयावर वेबिनार आयोजित केले होते.

'भारताची डिजिटल स्वप्ने आणि सायबर सुरक्षा' या व्यापक संकल्पनेअंतर्गत महिला आणि मुलींसाठी सुरक्षित आणि समान ऑनलाइन स्थान देण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी, राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग आणि यूएन वूमेन इंडिया यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या उपक्रमांच्या मालिकेची सुरुवात या वेबिनारच्या माध्यमातून झाली.

राष्ट्रीय ई-प्रशासन विभागाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, माय गव्ह चे मुख्य कार्यकारी आणि डिजिटल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक सिंह यांनी आपल्या मुख्य भाषणात, सायबर सुरक्षा जागरुकता वाढविण्याच्या गरजेवर भर दिला आणि सायबर फसवणूक, छळवणूक शोषण, सायबर आणि लिंग-आधारित हिंसाचाराला बळी पडू नये यासाठी सर्व नागरिकांनी डिजिटली स्मार्ट असणे महत्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. यासंदर्भात भारत सरकारने नियोजित केलेली आणि हाती घेतलेली विविध पावले त्यांनी अधोरेखित केली. “माहिती तंत्रज्ञानाद्वारे (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021, फेब्रुवारी 2021 मध्ये जारी करण्यात आले. भारत सरकार सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या समाजमाध्यम व्यासपीठावर विवेकीपणा आणत आहे आणि प्रत्येकाचे, विशेषत: महिला आणि मुलींचे हक्क सुरक्षित ठेवणे सुनिश्चित करत आहे असे त्यांनी सांगितले.

यूएन वूमेन इंडियाच्या भारतातील प्रतिनिधी श्रीमती सुसॅन फर्ग्युसन यांनी जागरूकता वाढवणे आणि दृष्टिकोन बदलांसंदर्भात आशावाद व्यक्त केला. श्री शक्ती चॅलेंज 2021 आवृत्ती आणि यूएन वुमेन स्टँड सारख्या विविध उपक्रमांद्वारे महिलांचे अधिकार वाढविण्यासाठी यूएन वूमेन ची इलेकट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह  दीर्घकालीन भागीदारी आहे असे सांगत त्यांनी महिला आणि मुलींसाठी सुरक्षित आणि समान सायबरस्पेस तयार करून एक चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय ई-प्रशासन विभागसोबत काम करण्याची वचनबद्धता दर्शवली.

जगभरात, ऑक्टोबर महिना हा सायबर सुरक्षेला समर्पित असून हा महिना "राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना (NCSAM)" म्हणून साजरा केला जातो. ''डू युअर पार्ट. #BeCyberSmart'' ही राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना 2021 ची संकल्पना आहे.

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1763062) Visitor Counter : 364


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu