आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. मनसुख मांडवीया यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बेंगळुरु इथल्या एनआयएमएचएएनएस संस्थेमार्फत विशेष कार्यक्रम


मानसिक आजार हा मधुमेहाप्रमाणेच छुपे वार करणारा आजार

Posted On: 10 OCT 2021 8:02PM by PIB Mumbai

 

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. यानिमित्त, बेंगळुरु इथल्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जा विज्ञान संस्था, (NIMHANS)  ने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीया यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. कर्नाटकचे आरोग्य आणि वेद्यकीय शिक्षणमंत्री डॉ के सुधाकर, लोकसभा खासदार पी. चिक्कामुनी मोहन, अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, विकेश शील यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना डॉ मनसुख मांडवीया म्हणाले कीमानसिक आजार हा मधुमेहाप्रमाणेच रुग्णाच्या मानसिक आरोग्यावर घातक आजार अआहे. अनेकदा मधुमेहाचे निदान न झाल्यामुळे तो जीवघेणा ठरू शकतो, त्याचप्रमाणे मानसिक आजारांबाबत समाजात असलेल्या गैरसमजुतींमुळे लोक त्यावर उपचार घेण्यासाठी पुढे येत नाहीत, त्यामुळे तो ही घातक ठरतो, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

आपल्या जीवनशैलीत आणि कुटुंबव्यवस्थेत झालेले बदल अशा मानसिक आजारांसाठी कारणीभूत ठरतात. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागणे  हा अखेरचा उपाय असू शकतो. मात्र, काही मानसिक त्रास किंवा तणाव असलेल्या व्यक्तींच्या प्राथमिक लक्षणांवरुन घरच्या लोकांना त्यांना मदत करता येईल आणि समस्या अधिक गंभीर होण्यापूर्वीच त्यावर उपाय शोधता येऊ शकतो.

त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांमध्ये असा काही मानसिक तणाव असेल, तर शिक्षकांना तो लक्षात येऊ शकतो, आणि अगदी सुरुवातीलाच  या समस्येवर उपाययोजना करता येतात.

यासाठी सरकार आणि समाज एकत्रित काम करू शकतात, असे मांडवीया म्हणाले. मानसिक आरोग्याबाबत अधिक संशोधन देखील होण्याची गरज असून, यासाठी, एनआयएमएचएएनएस सारख्या सजुन्या आणि सुप्रसिद्ध संस्था पुढाकार घेऊ शकतील, असे मांडवीया म्हणाले. अशा संशोधनांचा आधार घेऊन सरकारला याबाबत आपले धोरण तयार करता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

भारतात, मानसोपचार तज्ञांची संख्या कमी असल्याचे लक्षात घेत, मनसुख मांडविया म्हणाले की केवळ गुण मिळवण्यासाठी घेतलेले शिक्षण, हे देशासाठी उपकारक नसते. विद्यार्थ्यांनी अशा शिक्षणावर भर द्यावा, आणि ज्यांना आल्या सेवेची, आधाराची गरज आहे, अश लोकांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न करावा, त्यासाठीचे प्रशिक्षण-शिक्षण घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या संस्थेमधून शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. पोलीस विभागाच्या माहितीनुसार, दरवर्षी देशात सुमारे 1.36  लाख लोक आत्महत्या करतात,अशी माहिती त्यांनी दली. लोक आत्महत्या करतात कारण, त्यांना काहीतरी मानसिक तणाव असतो, त्रास असतो. आपल्याला एका निरोगी राष्ट्राची उभारणी करायची आहे. केवळ निरोगी नागरिकच एका निरोगी समाजाची, पर्यायाने निरोगी राष्ट्राची उभारणी करू शकतात. एक निरोगी राष्ट्रच आदर्श राष्ट्र बनू शकते आणि असा देश बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आज उत्तीर्ण होणाऱ्या डॉक्टरांना, अशा मानसिक रुग्णांची काळजी घेत, राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची संधी मिळाली आहे, असे मांडवीया म्हणाले. कोविडच्या आव्हानात्मक काळात, डॉक्टर्स, निमवैद्यकीय कर्मचारी आणि युवकांनी केलेल्या समर्पित आणि नि:स्वार्थ सेवेसाठी, मांडवीया यांनी या सर्वांचे कौतुक केले.

***

S.Thakur/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762753) Visitor Counter : 287