माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

डीडी न्यूज कॉन्क्लेव्ह फिनाले, 'भारत प्रथम' -एका विश्वगुरुचे निर्माण, या  परराष्ट्र धोरणावर केन्द्रीत

Posted On: 08 OCT 2021 2:44PM by PIB Mumbai

 

'आझादी का अमृत महोत्सव'चा एक भाग म्हणून- भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना, डीडी न्यूजने मान्यवर, धोरणकर्ते आणि संबंधित क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणून सात भागांच्या कॉन्क्लेव्ह अर्थात संमेलन मालिकेचा समारोप केला. कॉन्क्लेव्हमध्ये युवा शक्तीपासून सामाजिक सक्षमीकरण, राहणीमान सुलभतेपर्यंत, नवीन भारताच्या नानाविध पैलूंना स्पर्श करत विविध विषयांवर चर्चा झाली.

या मालिकेतील अंतिम कॉन्क्लेव्हमध्ये 'भारत प्रथम' -एका विश्वगुरुचे निर्माण, या परराष्ट्र धोरणावर चर्चा करण्यात आली. यात केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यशी थेट विशेष संवाद साधण्यात आला.  सत्राचे संचालन डॉ. हर्षवर्धन पंत, विशेष प्रतिनीधी, ओआरएफ यांनी केले. ते नंतर व्हाइस एडमिरल शेखर सिन्हा, एकात्मिक संरक्षण स्टाफचे माजी प्रमुख, डॉ अरविंद गुप्ता, माजी उप एनएसए आणि प्रा.  स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, जेएनयू यांच्या परिसंवादातही सहभागी झाले.  सत्रादरम्यान आंतरराष्ट्रीय संबंधांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी स्टुडिओत उपस्थित प्रेक्षकांनी संवाद साधला.

भारताच्या परराष्ट्र धोरणात 3 सीमुळे  परिवर्तन झाले आहे - कॅपेबिलिटीज् (क्षमता), क्रेडिबिलिटी (विश्वासार्हता) आणि कन्टेक्स्ट (संदर्भ) असे केन्द्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले.   कोविड -19 महामारीच्या काळात केलेल्या कामामुळे भारताची क्षमता वाढलेली दिसून आली आहे. पीपीपीच्या मोजणीनुसार  भारताची वाढती अर्थव्यवस्था आता तिसऱ्या क्रमांकाची आहे, जागतिक अजेंडा तयार करण्यात त्याचा प्रभाव आणि जागतिक मानवी संकटांना 'प्रथम प्रतिसाद देणारा' म्हणून त्याची भूमिका या सर्वांनी जगाचा भारताच्या क्षमतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

***

M.Chopade/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762091) Visitor Counter : 197