पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्थलांतरित पक्ष्यांच्या मध्य आशियाई उड्डाणमार्गावरील 30 देशांची दोन दिवसीय बैठक सुरू

स्थलांतरित पक्ष्यांचे रक्षण म्हणजे पाणथळ जमीन ,भूमी अधिवास आणि परिसंस्थेचे संवर्धन : भूपेंद्र यादव

Posted On: 06 OCT 2021 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्टोबर 2021

स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन कार्य  बळकट  करण्याच्या उद्देशाने स्थलांतरित पक्ष्यांच्या मध्य आशियातील उड्डाणमार्गावर असलेल्या देशांच्या दोन दिवसीय ऑनलाइन बैठकीला आज सुरुवात झाली. स्थलांतरित पक्ष्यांचा मध्य आशियाई उड्डाणमार्ग (सीएएफ) आर्क्टिक आणि हिंद  महासागराच्या दरम्यान असलेल्या  युरेशियाचा मोठा भाग व्यापतो.या उड्डाणमार्गात पक्ष्यांचे अनेक महत्त्वाचे स्थलांतर मार्ग आहेत. मध्य आशियाई  उड्डाणमार्गाअंतर्गत भारतासह 30 देश आहेत.

आपली  वचनबद्धता पूर्ण करण्याच्या दृष्टीने, भारताने मध्य आशियाई पक्षी उड्डाणमार्गावरील देशांसह 6-7 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय वन्यजीव संस्थेच्या वतीने दोन दिवसीय ऑनलाइन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये  भारत स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनातील सर्वोत्तम पद्धती आणि राष्ट्रीय कृती योजना, पक्ष्यांच्या मध्य आशियाई उड्डाणमार्गातील देशांशी  सामायिक करणार आहे. या बैठकीला सीएएफ श्रेणीतील देशांचे प्रतिनिधी, सीएमएसचे प्रतिनिधी, संबंधित  संघटना, जगभरातील या क्षेत्रातील तज्ञ, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित राहतील.

WhatsApp Image 2021-10-06 at 17.13.51.jpeg

स्थलांतरित पक्षी ज्या अधिवासामध्ये राहतात आणि प्रवास करतात अशा परिसंस्थेत हे पक्षी आवश्यक आणि अपरिहार्य भूमिका बजावतात यावर,पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री भूपेंद्र यादव यांनी आपल्या मुख्य भाषणात भर दिला. पक्षी अन्नपाणी घेण्यासाठी वापरत असलेले अधिवास समन्वित माहितीच्या आदानप्रदानाने प्रभावीपणे व्यवस्थापित केले जाऊ शकतात यावरही  त्यांनी जोर दिला. जगातील 11,000 पक्ष्यांच्या प्रजातींपैकी अंदाजे पाचपैकी एका प्रजातीचे पक्षी स्थलांतर करतात, काहीं प्रजातींचे पक्षी प्रचंड अंतर व्यापतात. स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी, देश आणि राष्ट्रीय सीमा ओलांडून संपूर्ण उड्डाण मार्गावर सहकार्य आणि समन्वय आवश्यक आहे.

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1761580) Visitor Counter : 187