रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
वाहने मोडीत काढण्याच्या धोरणासंदर्भात प्रोत्साहन लाभ आणि परावृत्तकारक तोट्यांशी संबंधित अधिसूचना जारी
Posted On:
05 OCT 2021 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2021
वाहने मोडीत काढण्याच्या धोरणामध्ये, एक प्रोत्साहन लाभ देणारी आणि जुन्या आणि प्रदूषणकारक वाहनांचा वापर सुरू ठेवण्यापासून संबंधित वाहनमालकांना परावृत्त करणारे तोटे असलेली प्रणाली असावी ज्यामध्ये खूप जास्त देखभाल आणि इंधन खपाचा खर्च असेल, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जीएसआर अधिसूचना 714(ई) दिनांक 4-10-2021 भारताच्या राजपत्रात जारी केली आहे आणि ती 1 एप्रिल 2022 पासून अंमलात येईल. याचा तपशील खालील प्रमाणे आहेः
- जुने वाहन मोडीत काढून वाहन मोडीत काढणाऱ्या नोंदणीकृत आस्थापनेद्वारे जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्राद्वारे नवे वाहन खरेदी करताना प्रोत्साहनलाभ म्हणून नव्या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात येईल.
- तर परावृत्तकारक तोट्यांचा विचार करता त्यानुसार:
- 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या तंदुरुस्ती प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी आणि तंदुरुस्ती चाचणीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ
- 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या मालवाहतूक वाहनांच्या तंदुरुस्ती प्रमाणीकरण शुल्कात वाढ
- 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वैयक्तिक वाहनाच्या (बिगर मालवाहतूक वाहन) नोंदणी शुल्कात वाढ
राजपत्रित अधिसूचना पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
S.Tupe/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1761267)
Visitor Counter : 305