शिक्षण मंत्रालय
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण आणि युवा व्यवहार मंत्र्यांशी चर्चा
ऑस्ट्रेलियात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मायदेशी परतण्याच्या मुद्यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा
Posted On:
05 OCT 2021 8:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2021
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ऑस्ट्रेलियाचे शिक्षण आणि युवा मंत्री अॅलन ट्ज यांच्याशी आभासी माध्यमाद्वारे चर्चा झाली. उच्च शिक्षण क्षेत्रात, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती व्यक्त केली. यात दोन्ही देशातील विद्यार्थ्यांना परस्परांच्या शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश, शिक्षकांचे आदानप्रदान, प्रत्यक्षात वापरात येणारे विज्ञान आणि परस्पर प्राधान्याच्या इतर बाबींवर भर देण्यात आला.

यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी, ऑस्ट्रेलियातून मायदेशी परत येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला. भारतीय विद्यार्थ्यांना सहज परत येता यावे यासाठी ऑस्ट्रेलिया सरकार काय पावले उचलत आहे, याची माहिती अॅलन ट्ज यांनी यावेळी प्रधान यांना दिली. ऑस्ट्रेलिया मधील भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येक पातळीवर पाठींबा देण्याविषयीची कटिबद्धता यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 भारतातील युवकांच्या आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी उपयुक्त ठरेल आणी भारताला जागतिक ज्ञानाचे केंद्र बनवेल, अशी ग्वाही धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. भारत आणि ऑस्ट्रेलियातील शिक्षण आणि कौशल्य विकासाचा परीघ, आणखी विकसित करण्यास बराच वाव आहे. असेही ते पुढे म्हणाले.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1761227)
अभ्यागत कक्ष : 223