PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
04 OCT 2021 7:15PM by PIB Mumbai

- 90.79 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 20,799 new cases in the last 24 hours
- Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.78%; Lowest since March 2020
- India's Active caseload stands at 2,64,458; lowest in 200 days
- Recovery Rate currently at 97.89%; Highest since March 2020
- 26,718 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,31,21,247
- Weekly Positivity Rate (1.63%) less than 3% for last 101 days
- Daily positivity rate (2.10%) less than 3% for last 35 days
- 57.42 cr Total Tests conducted so far
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona



नवी दिल्ली/मुंबई, 4 ऑक्टोबर 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 23,46,176 मात्रा देण्यात आल्या आहेत त्यामुळे भारताने 90.79 (90,79,32,861) कोटी कोविड-19 लसींच्या मात्रांचा टप्पा पार केला आहे. 88,05,668 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 26,718 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,31,21,247 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.89% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.
केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 99 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे. गेल्या 24 तासात 20,799 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,64,458 असून ही रुग्णसंख्या गेल्या 200 दिवसातील निचांकी आहे. तसेच देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.78% आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 9,91,676 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 57.42 कोटींहून(57,42,52,400) अधिक चाचण्या घेतल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.63% असून गेल्या 101 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.10% असून गेले सलग 35 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 118 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.
इतर अपडेट्स :
महत्त्वाचे ट्विट्स
* * *
S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760878)
अभ्यागत कक्ष : 159