PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
03 OCT 2021 5:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 3 ऑक्टोबर 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 73,76,846 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 90 कोटी मात्रांचा (90,51,75,348) टप्पा पार केला आहे.एकूण 87,84,333 सत्रांतून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे
HCWs
|
1st Dose
|
1,03,73,728
|
2nd Dose
|
89,27,894
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,55,078
|
2nd Dose
|
1,50,96,107
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
36,64,19,042
|
2nd Dose
|
8,75,36,699
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
16,09,82,138
|
2nd Dose
|
7,83,06,698
|
Over 60 years
|
1st Dose
|
10,21,47,774
|
2nd Dose
|
5,70,30,190
|
Total
|
90,51,75,348
|
गेल्या 24 तासांत 25,930 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,30,94,529 झाली आहे.
परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 97.87% आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.
केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 98 दिवस नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.
गेल्या 24 तासांत, 22,842 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 2,70,557 इतकी आहे आणि ही गेल्या 199 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.80% आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 12,65,734 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 57 कोटी 32 लाखांहून अधिक (57,32,60,724) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.66% असून गेले 100 दिवस हा दर 3% हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.80% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 34 दिवस 3% हून कमी आहे आणि आता गेले सलग 117 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.
इतर अपडेटस्
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत भारत सरकारतर्फे खरेदी केलेल्या (मोफत पुरवठा मार्गाने) आणि थेट राज्यांकडून खरेदी अशा एकूण 88 कोटी 94 लाखांहून अधिक (88,94,17,855) मात्रांचा पुरवठा झाला आहे .
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या 5 कोटी 38 लाखांहून अधिक (5,38,59,455) मात्रा अजूनही शिल्लक असून यापुढील काळातील लसीकरणासाठी त्या उपलब्ध आहेत.
Important Tweets
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760640)
Visitor Counter : 280