श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव यांच्या हस्ते डिजिसक्षमचा आरंभ- युवावर्गातील रोजगारक्षमता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने कामगार मंत्रालय व मायक्रोसॉफ्ट इंडिया यांचा संयुक्त उपक्रम

Posted On: 30 SEP 2021 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30  सप्टेंबर 2021

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंदर यादव यांनी आज डिजिसक्षम उपक्रमाचा प्रारंभ केला. डिजिसक्षम हा दिवसेंदिवस तंत्रज्ञानस्नेही होत चाललेल्या नव्या युगात युवावर्गाला आवश्यक असलेल्या रोजगारक्षमता वृद्धीगत करण्यासाठी सहाय्य करणारा उपक्रम आहे. हा मायक्रोसॉफ्ट इंडियाचा संयुक्त उपक्रम म्हणजे ग्रामीण व निमशहरी भागातील युवावर्गाला सहाय्यकारी असणाऱ्या सरकारच्या सध्याच्या अनेक कार्यक्रमाचा एक विस्तारित भाग आहे.

डिजिसक्षमच्या पुढाकाराने, पहिल्या वर्षात मुलभूत कौशल्यांसह प्रगत गणनासारखी कौशल्ये 3 लाखांहून जास्त विद्यार्थ्यांना विनामुल्य हस्तगत करता येतील. रोजगाराच्या शोधातील व्यक्ती राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल www.ncs.gov.in)च्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊ शकतात. निमशहरी भागातील आणि सोयी सुविधा उपलब्ध नसलेल्या कुटुंबातील व्यक्ती तसेच कोविडच्या काळात रोजगार गमावलेल्या व्यक्तीना या उपक्रमात प्राधान्य असेल.

वेगवान तंत्रज्ञानाबरोबर स्वतःला अद्ययावत राखणे, सतत कौशल्ये शिकणे वा त्यांची पुन्हा उजळणी करणे आणि ती वृद्धींगत करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

या नवीन उपक्रमामुळे  रोजगाराच्या शोधातील  जवळपास 1 कोटी व्यक्तींनी राष्ट्रीय करीअर सेवा या पोर्टलवर नोंदणी केली असून त्यांना जावास्क्रिप्ट, डेटा विज्युअलायझेशन, अडवान्स एक्सेल, पॉवर Bi. एचटीएमएल, प्रोग्रॅमिंग लॅन्ग्वेज, सॉफ्टवेअर डेवलपमेंट फन्डामेंटल्स, कोडिंगची तोंडओळख अश्या डिजिटल अर्थव्यवस्थेत आवश्यक कौशल्यक्षेत्रांमध्ये प्रशिक्षण घेता येईल. स्थानिक पातळीवर डिजिसक्षमची अंमलबजावणी आगाखान ग्रामीण सहाय्य कार्यक्रम भारत (AKRSP-I) यांच्याकडून होणार आहे.

डिजिसक्षम हा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिल्या वर्षांत 3,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानस्नेही करेल. प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस, माहिती(डेटा) विश्लेषण, सॉफ्टवेअर डेवलपमेंट फंडामेंटल्स, सुधारित डिजिटल प्रोडक्टीविटी अशी अनेक मायक्रोसॉफ्टची संसाधने राष्ट्रीय करीअर सेवा पोर्टलवरून वापरता येतील.

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1759752) Visitor Counter : 329


Read this release in: English , Hindi , Odia , Kannada