आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने लसीच्या 88 कोटी मात्रांचा टप्पा पार केला


गेल्या 24 तासांत, लसीच्या 65 लाख 34 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

सध्याचा रोगमुक्ती दर 97.85% आहे; मार्च 2020 पासूनचा हा उच्चांकी दर

गेल्या 24 तासांत देशात 23,529 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या (2,77,020) आतापर्यंतच्या एकूण बाधितांच्या संख्येच्या 0.82%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.74%) , गेले 97 दिवस 3% पेक्षा कमी

Posted On: 30 SEP 2021 9:42AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसारगेल्या 24 तासांतकोविड प्रतिबंधक लसीच्या 65,34,306  मात्रा देण्यात आल्यामुळेभारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 88 कोटी मात्रांचा  (88,34,70,578)   टप्पा  पार केला  आहे. देशभरात 85,92,824 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसारलसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे 

 

HCWs

1st Dose

1,03,72,470

2nd Dose

88,82,131

 

FLWs

1st Dose

1,83,52,116

2nd Dose

1,49,71,767

 

Age Group 18-44 years

1st Dose

35,78,56,886

2nd Dose

8,10,29,611

 

Age Group 45-59 years

1st Dose

15,88,81,646

2nd Dose

7,62,14,993

 

Over 60 years

1st Dose

10,10,10,623

2nd Dose

5,58,98,335

Total

88,34,70,578

 

 

गेल्या 24 तासांत 28,718 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,30,14,898 झाली आहे.

परिणामीसध्यादेशातील रोगमुक्ती दर 97.85 आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.

  

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळेगेले सलग 95 दिवस  नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.

  

गेल्या 24 तासांत, 23529 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 2,77,020 इतकी आहे आणि ही गेल्या 195 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.82 % आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 15,06254 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 56 कोटी 89 लाखांहून अधिक (56,59,56,439) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाचसाप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.82% असून गेले 97 दिवस हा दर 3%हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.56% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 31 दिवस 3% हून कमी आहे आणि आता गेले सलग 114 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

***

JaydeviPS/SKane/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1759583) Visitor Counter : 278