आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 30 SEP 2021 9:20AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 88 कोटी 34 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात देशभरात 23,529 नव्या रुग्णांची नोंद झाली

सक्रीय रूग्णसंख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी झाली असून सध्या ती 0.82% आहे आणि मार्च 2020 पासून ती सर्वात कमी आहे.

सक्रिय रुग्णसंख्या 2,77,020 असून गेल्या 195 दिवसांतील सर्वात कमी रूग्णसंख्या आहे.

रोगमुक्ती दर सध्या 97.85% आहे; मार्च 2020 पासून सर्वात उच्च स्तरावर आहे.

गेल्या 24 तासात 28,718 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यामुळे कोविडमुक्त रूग्णांची संख्या 3,30,14,898 इतकी झाली आहे.

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.74%) गेल्या 97 दिवसात 3% हून कमी

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.56%) असून गेले 31 दिवस 3% हून कमी

आतापर्यंत देशभरात कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 56 कोटी 89 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत

***

SP/JaideviPS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1759580) Visitor Counter : 238