PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 26 SEP 2021 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 26 सप्टेंबर 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

भारतात गेल्या 24 तासात लसींच्या 68,42,786  मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 85  कोटींपेक्षा अधिक मात्रा (85,60,81,527) देण्यात आल्या आहेत. एकूण 83,64,110  सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 26,032  रुग्ण कोविडमुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,29,02,351  रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

त्यामुळे बरे होण्याचा दर आता 97.77%.झाला आहे. बरे होण्याचा दर सध्या मार्च 2020 पासून सर्वाधिक स्तरावर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 91 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद आता होत आहे.

गेल्या 24 तासात 28,326  नव्या रुग्णांची नोंद झाली

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,03,476 आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या, आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.90% आहे.

देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण  14,88,945 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 56.32  कोटींहून अधिक (56,32,43,245) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.98% असून गेले 93 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.90 % इतका आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 27  दिवस 3% पेक्षा कमी आणि 110  दिवस 5% पेक्षा कमी आहे.

इतर अपडेट्‌स:-

 

G.Chippalkatti/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1758389) Visitor Counter : 166