आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 85 कोटींचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला


गेल्या 24 तासात 68 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.77%

गेल्या 24 तासात कोरोनाच्या 28,326 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3,03,476) एकूण रुग्णांच्या 0.90% आहे

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.98%) गेले 93 दिवस 3% पेक्षा कमी

Posted On: 26 SEP 2021 4:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26  सप्टेंबर 2021

भारतात गेल्या 24 तासात लसींच्या 68,42,786  मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 85  कोटींपेक्षा अधिक मात्रा (85,60,81,527) देण्यात आल्या आहेत. एकूण 83,64,110  सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या, वयोगटानिहाय एकूण लसीकरणाच्या आकडेवारीत पुढीलप्रमाणे लसींच्या मात्रांचा समावेश आहे-

 

HCWs

1st Dose

1,03,71,245

2nd Dose

88,28,268

 

FLWs

1st Dose

1,83,48,990

2nd Dose

1,48,10,221

 

Age Group 18-44 years

1st Dose

34,66,84,035

2nd Dose

7,34,36,483

 

Age Group 45-59 years

1st Dose

15,59,65,608

2nd Dose

7,35,71,780

 

Over 60 years

1st Dose

9,94,61,207

2nd Dose

5,46,03,690

Total

85,60,81,527

गेल्या 24 तासात 26,032  रुग्ण कोविडमुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,29,02,351  रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

त्यामुळे बरे होण्याचा दर आता 97.77%.झाला आहे. बरे होण्याचा दर सध्या मार्च 2020 पासून सर्वाधिक स्तरावर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 91 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद आता होत आहे.

गेल्या 24 तासात 28,326  नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,03,476 आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या, आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.90% आहे.

देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण  14,88,945 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 56.32  कोटींहून अधिक (56,32,43,245) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.98% असून गेले 93 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.90 % इतका आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 27  दिवस 3% पेक्षा कमी आणि 110  दिवस 5% पेक्षा कमी आहे.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1758280) Visitor Counter : 137