वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाणिज्य मंत्रालय निर्यातदारांनी सादर केलेल्या सर्व मुद्द्यांची काळजीपूर्वक तपासणी करेल आणि त्यावर कार्यवाही करण्यासाठी अहवाल तयार करेल- पीयूष गोयल


वाणिज्य सप्ताहाच्या निमित्ताने निर्यातकांशी पियुष गोयल यांचा मुंबई येथे संवाद

Posted On: 23 SEP 2021 9:03PM by PIB Mumbai

मुंबई, 23 सप्टेंबर 2021

अटलजींनी म्हणल्या प्रमाणे  आमचे ध्येय अंतहीन/ अथांग  आकाशाएवढे उंच /उत्तुंग असू शकते, परंतु पुढे जाताना हातात हात घालून एकत्र राहण्याचा  आपल्या मनात संकल्प असायला हवा, विजय आपलाच होईल, असा विश्वास वाणिज्य सप्ताहानिमित्त मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज निर्यातदारांशी  संवाद साधताना व्यक्त केला.

निर्यात पत  हमी महामंडळ, एक्झिम बँक आणि आणि विदेशी व्यापार महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात पियुष गोयल पुढे म्हणाले की पंतप्रधानांचा नेहमीच विश्वास राहिला आहे  की आपण भागधारकांशी जेवढा संवाद साधू तेवढे आपण व्यावहारिक अनुभवातून अधिक शिकू आणि तितके  अधिक आपण साध्य करू शकू. मला आजच्या संवादामध्ये हेच जाणवते

निर्यातदारांना भेडसावणाऱ्या समस्येवर आरबीआयच्या प्रतिसादाबद्दल माहिती देताना श्री गोयल पुढे म्हणाले की व्यापारी व्यवहारांच्या मुद्द्यावर, आरबीआयची नवीनतम मार्गदर्शक तत्त्वे अशी तरतूद करतात की प्रचलित परराष्ट्र व्यापार धोरणानुसार निर्यात/आयातीसाठी परवानगी असलेल्या वस्तूंसाठी अशा व्यवहारांना परवानगी आहे; रिझर्व बँक अशा प्रकरणांमध्ये कोणतेही उत्पादननिहाय बंधन किंवा मर्यादा ठेवत नाही, परंतु व्यापाऱ्यांना मालाचे खरे व्यापारी असणे आवश्यक आहे आणि केवळ आर्थिक मध्यस्थ नाही.

निर्बंध हटवून उद्योगांना सूट दिल्यावर होणाऱ्या प्रगतीविषयी सांगताना श्री गोयल म्हणाले की युएईचे मंत्री सांगत होते की ते  जेथे जातात तेथे एलईडी बल्बच्या यशोगाथेवर चर्चा करतात. आम्ही केलेली पहिली कारवाई म्हणजे एलईडी सबसिडी बंद करणे; जेव्हा आम्ही अनुदान बंद केले आणि उत्पादन वाढवले ​​आणि उद्योग चालवण्याचे स्वातंत्र्य दिले, तेव्हा आम्हाला अभूतपूर्व यश मिळाले

वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी निर्यातकांना विचारले की तुम्ही परकीय चलनात जास्त कर्ज घेणे का सुरू करत नाही? एसबीआयने असेही म्हटले आहे की, जर एखाद्या छोट्या बँकेकडे क्रेडिट ऑफर / कर्ज देऊ करण्यासाठी परकीय चलन नसेल तर एसबीआय त्यांना परकीय चलन देण्यास तयार आहे.

श्री गोयल पुढे म्हणाले की विनिमय दराच्या बाबतीत बँकांनी थोडे अधिक उदार असणे आवश्यक आहे, बँकांनी खरे तर मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योगांना दंड करण्यापेक्षा फायदा दिला पाहिजे.

मंत्र्यांनी निर्यातकांना सल्ला दिला की त्यांनी  लहान कार्य समूह तयार करावेत  आणि आवश्यक असलेल्या मूलभूत संरचनात्मक सुधारणांचा विचार करावा, जेणेकरून ते  तथाकथित मदतीच्या बेड्यांमधून मुक्त होतील. वाणिज्य मंत्रालय निर्यातदारांनी सादर केलेल्या सर्व मुद्द्यांची काळजीपूर्वक तपासणी करेल आणि त्यावर कारवाई/कार्यवाही  करण्यासाठी  अहवाल तयार करेल, सर्व मुद्दे विचारपूर्वक सोडवले जातील.

यावेळी बोलताना एक्झिम बँकेचे महाव्यवस्थापक तरुण शर्मा म्हणाले की आम्ही 100 पेक्षा जास्त देशांमध्ये उपस्थित आहोत आणि 60 देशांमध्ये  निर्यात होत आहे. आम्ही परदेशी बँका आणि संस्थांना क्रेडिट लाईन/पत मर्यादा  वाढवत आहोत, आणि प्रादेशिक आणि बहुपक्षीय विकास बँकांसह सह-वित्तपुरवठ्यात देखील सहभागी आहोत.

निर्यात ऋण/पत हमी महामंडळ चे चेअरमन/अध्यक्ष  एम सेन्थिलनाथन यांनी  75 मुलांसाठी शैक्षणिक किट पीयूष गोयल यांच्याकडे सुपूर्त केले.

यावेळी एसबीआय ने निर्यात वित्तपुरवठ्याविषयी सादरीकरण  केले की आणि नमूद केले की  2021-22 साठी 400 अब्ज डॉलर्सच्या व्यापारी निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्याच्या भारताच्या क्षमतेच्या मार्गात तरलता संकट कधीही उभे राहणार नाही.

 

MC/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1757447) Visitor Counter : 334


Read this release in: English , Urdu , Hindi