सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या  मुंबईतल्या कार्यालयाला दिली भेट,दूरदृश्य प्रणालीद्वारे रोहतक तंत्रज्ञान केंद्राचे केले उद्घाटन


उद्योजकांचे राष्ट्र म्हणून भारताला घडवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला योगदान देण्याकरिता तंत्रज्ञान केंद्रांची उभारणी सहाय्यकारक  ठरेल - नारायण राणे

Posted On: 17 SEP 2021 4:57PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज 17सप्टेंबर  2021ला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या  मुंबईतल्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी हरियाणातल्या रोहतक इथल्या तंत्रज्ञान केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. एमएसएमई अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत असलेल्या या केंद्राचा 20 एकरवर विकास करण्यात आला आहे. या केंद्रात दर वर्षी 8,400पेक्षा जास्त  प्रशिक्षणार्थीना  प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. 135 कोटी लोकसंख्येच्या आपल्या राष्ट्राला अधिकाधिक तंत्रज्ञान केंद्रांची आवश्यकता असून त्यांची जलद गतीने उभारणी होण्याची  गरज त्यांनी व्यक्त केली.

उद्योजकांचे राष्ट्र  म्हणून आकार देण्यासाठी आणि राष्ट्रीय जीडीपी अर्थात सकल  राष्ट्रीय उत्पादनात वृद्धी होण्यासाठी या केंद्रांमध्ये विकसित करण्यात आलेले नवे तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे असे ते म्हणाले.या एमएसएमई केंद्रात विकसित तंत्रज्ञान, कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक काळातआत्मनिर्भर भारत अभियानाला वेग देईल  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दारिद्रयाविरोधातल्या लढ्यासाठी  याची मदत होऊन महाशक्ती म्हणून पुढे येण्यासाठी देशाला मदत होईल असे त्यांनी सांगितले.

याआधी त्यांनी महाराष्ट्रातल्या, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम संस्थाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

राणे यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला आणि संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. खासदार डॉ अरविंद शर्मा,एमएसएमई  सचिव बी बी स्वैन, एमएसएमई अतिरिक्त सचिव देवेंद्र कुमार सिंग, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रीता वर्मा यावेळी उपस्थित होत्या.

***

M.Chopade/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1755827) Visitor Counter : 157


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi