नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी विशाखापट्टणम – मुंबई मार्गावरच्या थेट विमानाला दाखवला हिरवा झेंडा
Posted On:
15 SEP 2021 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2021
नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया आणि नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री जनरल डॉ व्ही के सिंह ( निवृत्त )यांनी विशाखापट्टणम ( आंध्रप्रदेश)ते मुंबई (महाराष्ट्र)दरम्यानच्या पहिल्या स्पाईसजेट थेट विमानाला दूरदृश्य प्रणाली द्वारे हिरवा झेंडा दाखवला.
विशाखापट्टणम ते भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई दरम्यानची थेट विमान सेवा सुरु करत असल्याची घोषणा करताना आपल्याला आनंद होत असल्याचे सिंदिया यांनी यावेळी बोलताना सांगितले. यामुळे रोजगार,पर्यटन तसेच विद्यार्थ्यांसाठी उत्तम कनेक्टीव्हिटी यासाठीच्या संधी खुल्या होणार असून विशाखापट्टणमसाठी आर्थिक घडामोडीमध्ये मोठी वाढ होण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उडान म्हणजेच उडे देश का आम नागरिक या धोरणा अंतर्गत देशाच्या आतील भागांना उत्तम हवाई संपर्क प्रदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आज आपण देशाच्या विविध राज्यात 38 आणखी विमान सेवा सुरु करत असल्याचे त्यांनी सांगितले.
विशाखापट्टणम ते मुंबई दरम्यान सध्या फक्त एअर इंडिया समूहाची विमानसेवा सुरु आहे आणि या मार्गावर अतिरिक्त विमानसेवेची दीर्घ काळापासून मागणी होती. स्पाइसजेटची अतिरिक्त विमान सेवा ही केंद्र सरकारच्या सब उडे, सब जुडे उपक्रमाच्या उद्देशाला अनुसरून आहे. देशातली द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांदरम्यान हवाई संपर्क मजबूत करण्याचा यामागचा उद्देश आहे.
विमान सेवेचे वेळापत्रक याप्रमाणे आहे-
Flight No
|
Sector
|
Dep
|
Arrival
|
Frequency Aircraft
|
SG 436
|
Visakhapatnam-Mumbai
|
9:50
|
11:45
|
MONDAY, WEDNESDAY, THURSDAY, SATURDAY
|
SG 435
|
Mumbai-Visakhapatnam
|
7:15
|
9:00
|
MONDAY, WEDNESDAY, THURSDAY, SATURDAY
|
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755168)
Visitor Counter : 155