PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
13 SEP 2021 6:40PM by PIB Mumbai
- 74.38 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 27,254 new cases in the last 24 hours
- Active cases account for 1.13% of total cases
- India's Active caseload stands at 3,74,269
- Recovery Rate currently at 97.54%
- 37,687 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,24,47,032
- Weekly Positivity Rate (2.11%) less than 3% for last 80 days
- Daily positivity rate (2.26%)less than 3% for last 14 days
- 54.30 crore Total Tests conducted so far
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
नवी दिल्ली/मुंबई, 13 सप्टेंबर 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात दिलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या 53,38,945 मात्रांसह देशाच्या कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती वाढून एकूण 74.38 (74,38,37,643) कोटी मात्रांच्या पुढे गेली आहे. 75,64,949 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत. देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
गेल्या 24 तासांत 37,687 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,24,47,032 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.54% झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 78 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे. गेल्या 24 तासात 27,254 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3, 74, 269 असून आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.13% आहे.
देशभरात कोविड-19 चाचणी क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 12,08,247 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 54.30 (54,30,14,076) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.11% असून गेल्या 80 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.26% असून गेले सलग 14 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 97 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.
इतर अपडेट्स :
- राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि राज्याद्वारे थेट खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून 72.70 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा उपलब्ध केल्या असून 8 लाखाहून अधिक मात्रा पुरवठा प्रक्रीयेत आहेत.
महत्त्वाचे ट्विट्स
* * *
M.Chopade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1754565)
Visitor Counter : 157