आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 प्रतिबंधक लसीची राज्ये/केन्द्र शासित प्रदेशातील उपलब्धतेची अद्यावत माहिती


राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना आतापर्यंत 72.70 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रा केल्या उपलब्ध

राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांकडे अजूनही 4.90 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयुक्त मात्रा, शिल्लक 8 लाखापेक्षा अधिक मात्रा पुरवठा प्रक्रीयेत

Posted On: 13 SEP 2021 9:54AM by PIB Mumbai

देशभरातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे जेणेकरुन ते लसीकरणाचे अधिक उत्तम नियोजन करु शकतील आणि लसींची पुरवठा साखळी  सुरळीत राखता येईल.

 

देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करत आहे. केन्द्र सरकार कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसींची खरेदी करेल, राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना त्याचा मोफत पुरवठा केला जाईल.

 

VACCINE DOSES

 

(As on 13thSeptember 2021)

 

SUPPLIED

 

72,70,48,325

 

PIPELINE

 

8,25,000

 

BALANCE AVAILABLE

 

 

4,90,36,525

केंद्र सरकारने आतापर्यंत 72.70 (72,70,48,325)  कोटींहून अधिक  लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि राज्याद्वारे थेट खरेदी प्रक्रियेच्या अर्थात  सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 8 (8,25,000) लाखाहून अधिक  मात्रा पुरवठा प्रक्रीयेत आहेत.

 

4.90 (4,90,36,525) कोटी  न वापरलेल्या मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांकडे वापरण्यासाठी  शिल्लक आहेत.

***

Jaydevi PS/VG/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1754428) Visitor Counter : 336