माहिती आणि प्रसारण मंत्रालय

शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणावर अनुराग ठाकूर यांचे जेएनयूमधील कार्यक्रमात संबोधन

Posted On: 11 SEP 2021 10:10PM by PIB Mumbai

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 128 वर्षांपूर्वी झालेल्या शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणावर आज जेएनयूमधील कार्यक्रमात आभासी पद्धतीने आपले विचार व्यक्त केले.

ते म्हणाले, ``शिकागो मधील जागतिक धर्म परिषदेत 1893 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाचे 128 वे वर्ष सुरू असताना, त्यानिमित्त आपल्याला संबोधित करण्यास मला आमंत्रित केल्याबद्दल मी माझा सन्मान समजतो. त्यांच्या भाषणाने संपूर्ण जगाला स्तंभित केले होते. अगदी आजही ते आतापर्यंतच्या सर्वांत शक्तिशाली आणि संस्मरणीय भाषणांपैकी एक आहे. त्यांचे मर्मभेदक आणि विचार करायला भाग पाडणारे ते भाषण म्हणजे एक अतुलनीय आणि अविस्मरणीय आवाहन होते.``

मंत्री पुढे म्हणाले की, ``आपण आपल्या वारशाचा अभिमान बाळगणारे आणि भविष्याचा वेध घेणारे राष्ट्र आहोत. आपण एक असे राष्ट्र आहोत, जे नवीन कल्पनांना महत्त्व देतात आणि नव भारताच्या उभारणीसाठी नवकल्पनांवर भर देतात. आपण असे एक राष्ट्र आहोत, जे अध्यात्मिकतेच्या उपचार शक्तीवर तसेच जगाला एका उत्तम उंचीवर नेण्यासाठी सॉफ्टवेअरच्या परिवर्तन शक्तीवर देखील विश्वास ठेवतो !``

ते पुढे म्हणाले की, ``सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि मंत्र, हा स्वामी विवेकानंदजींच्या विचारांना मूर्त रूप आणि मोजक्या शब्दांत स्पष्ट करतात.``

ठाकूर म्हणाले, `` पूर्व आणि पश्चिम यामध्ये प्रथमच आध्यात्मिक आधारावर संवाद स्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून, त्यांनी जगाला आपल्या प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीची ओळख करून दिली. त्यांच्या शब्दांनी अनेकांना जागृत केले आणि अनेकांना आपली राष्ट्रीय ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरित केले.``

***

S.Patil/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1754210) Visitor Counter : 115