रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते पायाभूत सुविधांचा पूर्वीपेक्षा जलद, सुरक्षित आणि अधिक शाश्वत पद्धतीने विकास – नितीन गडकरी
Posted On:
06 SEP 2021 6:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2021
केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली रस्ते पायाभूत सुविधा पूर्वीपेक्षा अधिक जलद, सुरक्षित आणि अधिक शाश्वत पद्धतीने विकसित होत आहेत. एनएचएआय, एनएचआयडीसीएल मंत्रालयाचे आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांच्यासह एका बैठकीत ते म्हणाले की, जागतिक स्तरावरच्या रस्ते पायाभूत सुविधा देशाच्या सेवेत अर्पण करणे हे आपले सामायिक ध्येय आहे. रस्त्यांच्या रचना आणि बांधणी यासंदर्भात सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देणारा दृष्टिकोन, पर्यावरणपूरक रस्त्यांची बांधणी, औद्योगिक पूरक दृष्टिकोन, सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञान, अधिक जलद आणि किफायतशीर रस्ते आणि वेगवान बांधकाम यावर मंत्र्यांनी भर दिला.
गडकरी म्हणाले की, 11,000 रुपये कोटींच्या गुंतवणुकीसह 313 किलोमीटर लांबीचा महामार्ग पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवेल. ते म्हणाले महामार्गाचे 80 % काम पूर्ण झाले आहे आणि मार्च 2022 मध्ये तो जनतेसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. ते म्हणाले, सहापदरी अंबाला – कोटपुतली हरित कॉरिडॉर विक्रमी वेगाने बांधला जात आहे.
* * *
N.Chitale/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1752620)
Visitor Counter : 244