आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 68.46 कोटी मात्रांचा टप्पा


गेल्या 24 तासात 71 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.42 %

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 42,766 नवे दैनंदिन रुग्ण

देशातील सध्या उपाचाराधीन रुग्णसंख्या (4,10,048) एकूण रुग्णांच्या 1.24 %

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.62 %) गेले 72 दिवस 3 % कमी

Posted On: 05 SEP 2021 9:56AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2021

एका महत्त्वपूर्ण कामगिरीमध्ये, भारतातील एकूण लसीकरणाच्या व्याप्तीने काल 68 कोटींचा टप्पा ओलांडला. आज सकाळ 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत गेल्या 24 तासात 71,61,760 मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण मात्रांची संख्या 68.46 कोटी (68,46,69,421) वर पोहोचली आहे. एकूण 71,39,683 सत्रांच्या माध्यमातून या लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.  

एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –

 

HCWs

1st Dose

1,03,60,742

2nd Dose

84,73,611

 

FLWs

1st Dose

1,83,29,504

2nd Dose

1,35,42,999

 

Age Group 18-44 years

1st Dose

27,04,12,926

2nd Dose

3,36,97,606

 

Age Group 45-59 years

1st Dose

13,60,64,549

2nd Dose

5,77,46,049

 

Over 60 years

1st Dose

8,93,79,209

2nd Dose

4,66,62,326

Total

68,46,69,521

 

कोविड – 19 लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि देशभरात त्याचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 38,091 रुग्ण बरे झाल्यामुळे, महामारीच्या प्रारंभीपासून आतार्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3,21,38,092 वर गेली आहे.

परिणामी, भाराता रुग्ण बरे होण्याचा दर 97.42 % झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 70 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात 42,766 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,10,048 असून एकूण बाधित रुग्णांच्या 1.24 % आहे.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरू असून गेल्या 24 तासात 17,47,476 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारताने तापर्यंत 53 कोटीहून अधिक (53,00,58,218) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.62 % असून गेले 72 दिवस 3 % पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.45 % असून गेले 90 दिवस 5 % पेक्षा कमी आहे.

***

MaheshC/SeemaS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1752287) Visitor Counter : 195