नौवहन मंत्रालय

केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टला भेट देत प्रकल्पांचा घेतला आढावा

Posted On: 03 SEP 2021 9:10PM by PIB Mumbai

मुंबई, 3 सप्‍टेंबर 2021

 

केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टला भेट देऊन प्रकल्पांचा आढावा घेतला. देशांतर्गत पर्यटकांना गोव्याला जाण्यासाठी क्रूझ सेवा देणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या देशांतर्गत क्रूझ टर्मिनलवरील पायाभूत सुविधा आणि आगामी प्रकल्पांचा आढावा घेतला.

22 एमएमटीपी क्षमतेच्या दृष्टीने सर्व प्रमुख बंदरांमधील सर्वात मोठा तेलाचा धक्का असलेल्या आणि पूर्णपणे भरलेल्या सुएझ मॅक्सच्या जहाजांना आणि अंशतः भरलेल्या व्हीएलसीसी म्हणजेच सर्वात मोठ्या क्रूड वाहकाला पुरवठा करणाऱ्या नव्याने बांधलेल्या 5 व्या तेल धक्क्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांबाबत अध्यक्ष राजीव जलोटा यांनी माहिती दिली.हा प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पाचे राष्ट्रार्पण अद्याप बाकी आहे.

बंदरामध्ये प्रस्तावित आणि चालू असलेल्या इतर प्रकल्पांबाबतही मंत्र्यांना माहिती देण्यात आली. पाचव्या तेलाच्या धक्क्याच्या बांधकामामुळे दुहेरी हाताळणी टाळल्यामुळे आतापर्यंत राष्ट्रीय तिजोरीत 200 कोटी रुपयांची बचत झाली आहे, बीपीसीएल आणि एचपीसीएलच्या कार्यकारी संचालकांनी ही माहिती दिली.

   

श्री सोनोवाल यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्रयत्नांचे विशेषतः मुंबई मेट्रो बोगद्याच्या उत्खनन साहित्याचा वापर करून भराव घालण्यासाठीच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.त्यांनी 5 व्या तेल धक्क्यावर असलेल्या 'नॉर्डॅक मून' सुएझ मॅक्स टँकरला भेट दिली आणि जहाजाच्या चालकाशी संवाद साधला. त्यांनी देशांतर्गत क्रूझ टर्मिनल, ऑफशोर कंटेनर टर्मिनल, लॉक गेट, ड्राय डॉक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनललाही भेट दिली.त्यानंतर, त्यांनी सर्व विभागप्रमुख आणि संबंधितांसोबत बैठक घेतली.

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1751864) Visitor Counter : 224


Read this release in: English , Urdu , Hindi