शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची उद्या कुलगुरूंसोबत बैठक

प्रविष्टि तिथि: 02 SEP 2021 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2021

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उद्या म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी देशातील 45 केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत आभासी पद्धतीने बैठक घेणार आहेत. गेल्या महिन्यापासून शिक्षणमंत्री विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची भेट घेत असले तरी उद्या सर्व कुलगुरू आणि शिक्षणमंत्री यांची ही पहिलीच एकत्रित औपचारिक बैठक असणार आहे. या बैठकीत खालील मुद्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

  1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ची अंमलबजावणी. 
  2. शैक्षणिक  क्रेडिट बँक व्यवस्था
  3. बहु प्रवेश-आणि शिक्षण सोडण्याची व्यवस्था
  4. मुक्त तसेच ऑनलाईन शिक्षण 
  5. शिक्षण संस्थांसाठी ‘ग्लू ग्रँट’ व्यवस्था
  6. शैक्षणिक वर्ष 2021-22 ची सुरुवात
  7. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/ ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठीच्या शिक्षकांच्या प्रलंबित रिक्त जागा भरण्यासाठी पावले उचलण्याविषयी चर्चा.
  8. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1751562) आगंतुक पटल : 229
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi