ऊर्जा मंत्रालय

पॉवरग्रीडने पटकावले जागतिक स्तरावर प्रतिष्ठेचे मानले जाणारे एटीडी बेस्ट अवॉर्ड

Posted On: 02 SEP 2021 5:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2021

केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालया अंतर्गत महारत्न केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाने प्रतिष्ठीत असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट ( एटीडी) 2021 बेस्ट अवॉर्ड पटकावले आहे. जगभरातल्या 71 संस्थांमध्ये 8 वे स्थान पटकावत हे पारितोषिक पटकावणारा एकमेव सार्वजनिक उपक्रम आणि सर्वोच्च 20 कंपन्यांमधल्या केवळ दोन भारतीय कंपन्यांपैकी एक  उपक्रम ठरला आहे.

असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट ही संस्थामध्ये प्रतिभा विकसित  करण्यासाठी समर्पित जगातली सर्वात मोठी संघटना असून एटीडी बेस्ट अवॉर्ड हे कौशल्य विकसित उद्योगातला  सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो.  प्रतिभा विकासाद्वारे आस्थापना  यशस्वीतेचे दर्शन घडवणाऱ्या संस्थांची दखल हा जागतिक कार्यक्रम घेतो. 

प्रतिभा विकासाला पोषक पद्धती आणि कार्यक्रम  यामध्ये  परिश्रम पूर्वक प्रयत्नासाठी पॉवरग्रीडला हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे. पॉवरग्रीड अकादमी ऑफ लीडरशिपने ( पीएएल) हा प्रतिभा विकास उपक्रम पॉवरग्रीड मध्ये राबवला होता.

पीएएल ही व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्लायंटना सेवा देणारी  पॉवरग्रीडची संस्था आहे. कर्मचाऱ्यांची कामगिरी वृद्धींगत करण्यासाठी, कंपनी संस्कृतीत सुधारणा आणि ती  दृढ करणे यासाठी प्रशिक्षण आणि उपक्रम यामध्ये राबवले जातात.

 

Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1751434) Visitor Counter : 190