आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

एकाच दिवसात सर्वाधिक 1.33 कोटीहून अधिक लसींच्या मात्रा देत भारताने आतापर्यंतचा एकाच दिवशी सर्वाधिक लसींच्या मात्रा देण्याचा नवा उच्चांक गाठला आहे


भारतातील कोविड -19 लसीकरणाने एकूण 65.41 कोटी पेक्षा अधिक मात्रा देण्याचे कार्य पूर्ण केले आहे.

रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर सध्या 97.51% आहे.

गेल्या 24 तासांत 41,965 दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद झाली.

भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या (3,78,181) एकूण रुग्णांच्या 1.15% आहे

गेले सलग 68 दिवस साप्ताहिक पाँझिटिव्हिटी दर (2.58%) 3% पेक्षा कमी आहे.

Posted On: 01 SEP 2021 10:13AM by PIB Mumbai

लसीकरण मोहिमेत महत्वपूर्ण टप्पा गाठत भारतात लसीकरणाअंतर्गत  काल 1 कोटीहून अधिक कोविड -19 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 5  दिवसात भारताने दोन वेळा हे यश प्राप्त केले आहे.आज सकाळी 7 पर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये 1,33,18,718 लसीच्या मात्रा देत भारताच्या कोविड -19 लसीकरणाने 65.41 कोटी (65,41,13,508) लसींच्या मात्रा देणे पूर्ण करत मागील संख्येला मागे टाकले आहे. हे लसीकरण  69,06,357 सत्रांच्या द्वारे साध्य झाले आहे.


आज सकाळी 7 वाजेपर्यंत  प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार लसींच्या एकत्रित मात्रांच्या संख्येची गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे:

 

HCWs

1st Dose

1,03,58,781

2nd Dose

83,94,433

 

FLWs

1st Dose

1,83,24,133

2nd Dose

1,32,40,353

 

Age Group 18-44 years

1st Dose

25,49,87,186

2nd Dose

2,87,15,564

 

Age Group 45-59 years

1st Dose

13,21,30,747

2nd Dose

5,51,36,560

 

Over 60 years

1st Dose

8,75,30,680

2nd Dose

4,52,95,071

Total

65,41,13,508


संपूर्ण देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची गतीमानता वाढवणे आणि देशभरात मोहिमेच्या व्याप्तीचा  विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.


गेल्या 24 तासांत 33,964 रूग्ण कोविडमुक्त झाले त्यामुळे  कोविड संसर्गातून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या सुरुवातीपासून) 3,19,93,644  झाली आहे.


परिणामी, भारताचा रोगमुक्ती दर 97.51%आहे.

 

 

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांच्याद्वारे केल्या गेलेल्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे, आता सलग 66 व्या दिवशी 50,000 पेक्षा कमी दैनंदिन नवीन रूग्णांची नोंदणी झाली आहे. 


गेल्या 24 तासांत 41,965 नवीन कोविडग्रस्त रूग्णांची नोंद झाली. 



देशातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 3,78,181 इतकी  आहे. ही संख्या सध्या देशातील एकूण सक्रीय रुग्णांच्या 1.15% आहेत.

 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची  क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 16,06,785 कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकूण  52.31 कोटी (52,31,84,293)कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्यात आल्या आहेत.


देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार होत असताना, सध्या साप्ताहिक सकारात्मकता (पाँझिटिव्हिटी) दर 2.58% असून  हा दर गेल्या 68 दिवसांपासून 3% पेक्षा कमी राहिला आहे . दैनंदिन  सकारात्मकता दर 2.61%आहे. सलग 86 दिवसांपासून दैनंदिन सकारात्मकता दर 5% च्या खाली राहिला आहे.

 


****

UU/SP/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1751058) Visitor Counter : 211