संरक्षण मंत्रालय
अल्जीरियाच्या नौदलासोबत भारतीय नौदलाने केला पहिला संयुक्तसराव
Posted On:
31 AUG 2021 10:44AM by PIB Mumbai
युरोप आणि आफ्रिकेच्या सदिच्छा भेटीवर असलेली , आयएनएस तबर ही भारतीय नौका 29 ऑगस्ट 21 रोजी 'इज्जादेर'(Ezzadjer) या अल्जेरियाच्या नौदलाच्या जहाजासोबत आपल्या पहिल्या संयुक्त सरावात सहभागी झाली .
अल्जेरियाच्या सागरी हद्दीत झालेल्या या ऐतिहासिक सागरी कसरतींमध्ये 'इज्जादेर' अल्जेरियाच्या युद्धनौकेचा सहभाग होता.
या सरावाअंतर्गत, भारतीय आणि अल्जेरिच्या नौदलाने मनुष्यबळाचा समन्वय, संप्रेषण प्रक्रिया आणि स्टीम पास्ट यासह विविध उपक्रम संयुक्तपणे केले . या अभ्यासामुळे दोन्ही नौदलांना परस्परांच्या कार्याची संकल्पना समजून घेण्याची, एकमेकांची काम करण्याची पद्धत जाणून घेता आली .याशिवाय भविष्यात त्यांच्यातील परस्परसंवाद आणि सहकार्य वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
***********
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750705)