अर्थ मंत्रालय

विलंब शुल्क कर्जमाफी योजनेची शेवटची तारीख वाढवणे आणि जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज रद्द करण्याची वेळ मर्यादा वाढवणे

Posted On: 29 AUG 2021 9:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021

शासनाने अधिसूचना क्रमांक 19/2021 केंद्रिय कर, दिनांक 01.06.2021 द्वारे, करदात्यांना जुलै, 2017 ते एप्रिल 2021 या कर कालावधीसाठीचा परतावा 01.06.2021 ते 31.08.2021 दरम्यान सादर केला असेल, तर त्यासाठी नॉन – फर्निशिंग फॉर्म GSTR – 3B साठी विलंब शुल्क कमी / माफ करून दिलासा दिला होता. विलंब शुल्क कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याची अखेरची तारीख आता विद्यमान 31.08.201 वरून 30.11.2021 करण्यात आली आहे. (अधिसूचना क्रमांक 33/201 – केंद्रिय कर, दिनांक 29.08.2021 संदर्भ पहा).

प्राप्त झालेल्या अनेक निवेदनांच्या आधारे, शासनाने नोंदणी रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करणाऱ्या अर्जासाठीची मुदत 30.09.2021 पर्यंत वाढविली आहे, जिथे नोंदणी रद्द करण्यासाठीचा निर्णय मागे घेण्याची विनंती करणारे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 01.03.2020 ते 31.08.2021 दरम्यान आहे. सीजीएसटी कायद्यांतर्गत 29 व्या उप-कलमाच्या (2) च्या खंड (b) किंवा कलम (c) अंतर्गत नोंदणी रद्द झाली असेल, तर त्या परिस्थितीत अर्जदारांना मुदत वाढवून मिळू शकते. (अधिसूचना क्रमांक 34/2021 – केंद्रीय कर, दिनांक 29.08.2021 संदर्भ पहा).

27.08.2021 ते 31.08.2021 या कालावधीसाठी डिजीटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) ऐवजी इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC) वापरणाऱ्या कंपन्यांनी FORM GSTR – 3B आणि FORM GSTR – 1 / IFF दाखल करणे आधीच सक्षम केले आहे. हे पुढे 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे. (अधिसूचना क्रमांक 32/2021 – केंद्रीय कर, दिनांक 29.08.2021 संदर्भ पहा).

विलंब शुल्क कर्जमाफी योजनेच्या शेवटच्या तारखेची मुदत वाढवून नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढल्याने मोठ्या प्रमाणात करदात्यांना लाभ होईल, विशेषतः लहान करदात्यांना, जे विविध कारणांमुळे विविरणपत्र दाखल करू शकले नसतील, मुख्यत्वे कोविड – 19 महामारीमुळे आलेल्या अडचणींमुळे आणि ज्यांची नोंदणी याचमुळे रद्द झाली, त्यांना याचा लाभ होईल. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी या वाढीव मुदतीचा करदात्यांनी लाभ घ्यावा, अशी करदात्यांना विनंती करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

S.Thakur/S.Shaikh/ P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1750280) Visitor Counter : 307


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu