राष्ट्रपती कार्यालय
गोरखपूर येथील महायोगी गोरखनाथ विद्यापीठाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
28 AUG 2021 6:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2021
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (ऑगस्ट 28, 2021) उत्तरप्रदेशात गोरखपूर येथील महायोगी गोरखनाथ विद्यापीठाचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, भारताला उच्च शिक्षणाचा गौरवशाली इतिहास आहे.तक्षशिला येथील जगातील पहिल्या विद्यापीठापासून ते नालंदा, उदंतपुरी, विक्रमशिला आणि वल्लभी विद्यापीठांपर्यंत असलेली ही परंपरा काही काळासाठी लोप पावली होती.मात्र आपले शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि शिक्षकांनी त्यांच्या बुद्धी आणि समर्पणाच्या जोरावर जगाला सतत प्रभावित केले आहे. आत्मनिर्भर , सामर्थ्यशाली आणि निरोगी भारताच्या उभारणीत योगदान देणारे हुशार विद्यार्थी महायोगी गोरखनाथ विद्यापीठ तयार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
योग, आयुर्वेद, वैद्यकीय शिक्षण, उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण इत्यादी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त हे विद्यापीठ काळाची गरज लक्षात घेऊन, रोजगार निर्मिती करणारे अभ्यासक्रम आयोजित करेल असे राष्ट्रपतींनी नमूद केले.
राष्ट्रपती म्हणाले की, शिक्षणाने चारित्र्य निर्माण केले पाहिजे अशी संकल्पना, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये आहे. शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, विवेक, करुणा आणि संवेदनशीलता विकसित केली पाहिजे तसेच त्यांना रोजगारासाठी सक्षम बनवले पाहिजे.
गोरक्षपीठ शतकानुशतके भारताच्या सामाजिक-धार्मिक प्रबोधनात प्रमुख भूमिका बजावत आहे, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ,या पीठाने राजकीय प्रबोधनात महत्वाची भूमिका बजावली होती, असे राष्ट्रपती म्हणाले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1749937)
Visitor Counter : 247