माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीडी न्यूजने यूट्यूबवर 4 दशलक्ष सब्स्क्रायबर्सचा टप्पा ओलांडला, प्रसार भारतीचे 2017 पासून एकूण 15 दशलक्ष सब्स्क्रायबर्स वाढले

Posted On: 26 AUG 2021 7:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2021

बदलते प्रसारण तंत्र, तंत्रज्ञान आणि दर्शकांची मागणी या  अनुषंगाने  प्रसार भारतीचे दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर डिजिटल प्लॅटफॉर्म गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झाले आहेत, ज्यामुळे सब्स्क्रायबर्स, फॉलोअर्स लाईक्स आणि व्ह्यूजमध्ये अनेक पटीने वाढ होत आहे.

अशीच एक महत्वपूर्ण कामगिरी बजावत , डीडी न्यूजने आपल्या यूट्यूब चॅनेलवर 4 दशलक्ष सब्स्क्रायबर्सचा टप्पा  ओलांडला आहे.  गेल्या महिन्यात जुलैमध्ये, डीडी नॅशनलने 4 दशलक्ष सब्स्क्रायबर्स संख्या गाठली होती.

2017 ते 2021 दरम्यान (आजपर्यंत), दूरदर्शन आणि आकाशवाणीने  बातम्या आणि इतर मनोरंजक कार्यक्रमामध्ये केवळ यूट्यूबवर 15 दशलक्षाहून अधिक डिजिटल सब्स्क्रायबर्स जोडले असून सध्याची डिजिटल सब्स्क्रायबर्स संख्या  1.73 कोटी (17.3 दशलक्ष) वर पोहचली आहे.

डीडी न्यूज आणि डीडी नॅशनलचे यूट्यूब चॅनेलचे लक्षावधी  सब्स्क्रायबर्स असून  प्रसार भारती स्पोर्ट्स आणि डीडी किसान यूट्यूब चॅनेल लवकरच मिलियन+ सबस्क्राइबर्स लीगमध्ये सामील होतील. आकाशवाणी नेटवर्कच्या यूट्यूब चॅनेलमध्ये ऑल इंडिया रेडिओचे नॅशनल न्यूज यूट्यूब चॅनेल, न्यूज ऑन एअर ऑफिशियल, अव्वल स्थानी आहे.

प्रादेशिक वाहिन्यांमध्ये डीडी चंदना (कन्नड), डीडी सह्याद्री (मराठी), डीडी सप्तगिरी (तेलुगू), डीडी बांगला, डीडी गिरनार (गुजराती), आकाशवाणी इंफाळ आणि ऑल इंडिया रेडिओच्या ईशान्य प्रदेश सेवेने यूट्यूबवर लक्षावधी  सब्स्क्रायबर्स संख्या नोंदवली आहे.

जर आपण अव्वल  10 चॅनेलच्या वर्षनिहाय सब्स्क्रायबर्स वाढीवर एक नजर टाकली तर आपल्याला  दिसून येईल की 2017 मध्ये वाढीला सुरुवात झाली आणि चढता कल कायम राहिला. डीडी नॅशनल आणि डीडी न्यूज या दोन अव्वल चॅनेलचा आजीवन वाढीचा आलेख हे दाखवतो आहे. 

या चॅनेलच्या  सब्स्क्रायबर्स वाढीचे वर्षनिहाय आकडेवारी  2018 ते 2020 दरम्यानच्या  वर्षांमध्ये  वाढ दर्शवते.

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1749321) Visitor Counter : 226