PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 25 AUG 2021 8:05PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 59.55 Crore vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 37,593 new cases in the last 24 hours
  • Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.99%
  • India's Active caseload stands at 3,22,327
  • Recovery Rate currently at 97.67%
  • 34,169 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,17,54,281
  • Weekly Positivity Rate (1.92%) less than 3% for last 61 days
  • Daily positivity rate (2.10%) less than 3% for last 30 days
  • 51.11 crore Total Tests conducted so far(Total)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 25 ऑगस्‍ट 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 59 कोटी मात्रांचा टप्पा काल पार केला. देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत भारताने गेल्या 24 तासात 61,90,930 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण  59.55 कोटीपेक्षा जास्त मात्रा (59,55,04,593) दिल्या आहेत. एकूण 65,52,748 सत्रांमधून मात्रा देण्यात आल्या  आहेत. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 34,169 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,17,54,281 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 97.67% झाला आहे.

सलग 59 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. गेल्या 24 तासात 37,593 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,22,327 आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1% पेक्षाही कमी म्हणजे सध्या 0.99% आहे.

चाचण्या करण्याच्या क्षमतेतही करणे वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 17,92,755 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 51.11 कोटीहून अधिक (51,11,84,547) चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असतानाच  साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.92% झाला असून गेले 61 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी 2.10% असून हा दर गेले 30  दिवस 3% पेक्षा कमी तर सलग 79 दिवस 5% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेट्स :

 

Important Tweets

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1749035) Visitor Counter : 107


Read this release in: English , Hindi , Manipuri , Gujarati