राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान उत्तर प्रदेशला भेट देणार

Posted On: 24 AUG 2021 6:40PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 26 ते 29 ऑगस्ट 2021 या कालावधीत उत्तर प्रदेशला  (लखनौ, गोरखपूर आणि अयोध्या)  भेट देतील.

26 ऑगस्ट, 2021 रोजी राष्ट्रपती लखनौ येथील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या 9 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.

27 ऑगस्ट, 2021 रोजी राष्ट्रपती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री डॉ.संपूर्णानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील आणि लखनौच्या  कॅप्टन मनोज पांडे सैनिकी  शाळेत एका प्रेक्षागृहाचे उद्घाटन करतील.त्याच दिवशी ते लखनौच्या संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या  26 व्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील.

28 ऑगस्ट 2021 रोजी राष्य्रपतींच्या हस्ते महायोगी गुरु गोरखनाथ आयुष महाविद्यालयाची पायाभरणी आणि गोरखपूर येथे महायोगी गोरखनाथ विद्यापिठाचे  उद्घाटन होणार आहे 

29 ऑगस्ट, 2021 रोजी राष्ट्रपती लखनौहून रेल्वेने प्रवास करत अयोध्येला भेट देतील, तेथे ते तुलसी स्मारक भवनाचे नूतनीकरण/बांधकाम आणि नगर बस स्थानक  आणि अयोध्या धामचा विकास यासह उत्तर प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाच्या  विविध प्रकल्पांचा प्रारंभ करतील. अयोध्या दौऱ्याची सांगता करण्यापूर्वी राष्ट्रपती श्रीराम मंदिराच्या बांधकाम स्थळालाही  भेट देतील आणि तेथे पूजाही करतील.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1748622) अभ्यागत कक्ष : 209