PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 22 AUG 2021 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 22 ऑगस्ट 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने काल 58 कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला.देशात गेल्या 24 तासांत लसीच्या 52,23,612 मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने (58,14,89,377) काल 58 कोटी 14 लाखांचा टप्पा पार केला. 64,39,411 लसीकरण सत्रांच्या आयोजनातून हे साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येची गटनिहाय विभागणी खालीलप्रमाणे आहे:

HCWs

1st Dose

1,03,53,366

2nd Dose

82,10,206

FLWs

1st Dose

1,83,03,885

2nd Dose

1,25,60,909

Age Group 18-44 years

1st Dose

21,63,66,206

2nd Dose

1,93,27,127

Age Group 45-59 years

1st Dose

12,24,63,403

2nd Dose

4,87,01,565

Over 60 years

1st Dose

8,32,68,790

2nd Dose

4,19,33,920

Total

58,14,89,377

देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढवणे आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करणे यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 38,487 रुग्ण कोविडमुक्त झाल्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) कोविडमधून बरे झालेल्यांची संख्या आता 3,16,36,469 झाली आहे.

परिणामी, भारताचा रोगमुक्ती दर सध्या 97.57% असून हा मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे गेले सलग 56 दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या 24 तासांत, भारतात 30,948 नव्या कोविडग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

कोविडमुक्त होणाऱ्यांची वाढत जाणारी संख्या आणि नव्याने बाधित होणाऱ्यांची कमी झालेली संख्या यांच्यामुळे देशातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 3,53,398 झाली आहे, जी गेल्या 152 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या देशातील एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.09% म्हणजेच मार्च 2020 पासूनच्या सर्वात नीचांकी पातळीवर आहे.

देशात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार सुरु असून गेल्या 24 तासांत एकूण 15,85,681 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 62  लाख (50,62,56,239) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार करत असताना, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2 % आहे, हा दर गेले 58 दिवस 3% हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील आज 1.95% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आता गेले 27 दिवस 3% हून कमी आणि सलग 76 दिवस 5% हून कमी राहिला आहे.

 

 

S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1748043) Visitor Counter : 260