ऊर्जा मंत्रालय

एनटीपीसीने  देशातील सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प सुरु केला

Posted On: 21 AUG 2021 6:25PM by PIB Mumbai

 

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ लिमिटेडने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे त्याच्या सिंहाद्री औष्णिक विद्युत केंद्राच्या जलाशयावर 25 मेगावॅटचा सर्वात मोठा तरंगता  सोलर पीव्ही प्रकल्प उभारला आहे. 2018 मध्ये केंद्र  सरकारने अधिसूचित केलेल्या फ्लेक्सिबिलायझेशन योजनेअंतर्गत उभारला जाणारा  हा पहिला सौर प्रकल्प आहे.

या सोलर  पीव्ही प्रकल्पाचे उद्घाटन आज एनटीपीसीचे  RED (WR2 & SR) संजय मदन यांनी केले.

या फ्लोटिंग सोलर इंस्टॉलेशनची विशिष्ट रचना असून ते RW जलाशयात 75 एकरवर पसरलेले आहे. या फ्लोटिंग सौर प्रकल्पात 1 लाखांहून अधिक सौर पीव्ही मॉड्यूलमधून वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे.यामुळे  केवळ 7,000 कुटुंबांना वीज पुरवण्यात  मदत होणार  नाही तर या प्रकल्पामुळे दरवर्षी किमान 46,000 टन  इतके कार्बन डायॉक्साईड (CO2e ) उत्सर्जन  टाळता येईल.

बंगालच्या उपसागरातून पाईपद्वारे  पाणी घेऊन   2,000 मेगावॅट वीजनिर्मिती करणारा  कोळसा आधारित सिंहाद्री स्टेशन हा पहिला औष्णिक विद्युत वीज प्रकल्प आहे जो . 20 वर्षाहून अधिक काळ हा प्रकल्प कार्यरत आहे.

याशिवाय एनटीपीसी सिंहाद्री येथे प्रायोगिक तत्वावर हायड्रोजन-आधारित मायक्रो-ग्रिड यंत्रणा उभारण्याची योजना आखत आहे.

66,900 मेगावॅट क्षमतेच्या एकूण स्थापित वीज निर्मिती   क्षमतेसह, एनटीपीसीकडे 29 नवीकरणीय प्रकल्पांसह 71 वीज केंद्रे  आहेत. एनटीपीसीने 2032 पर्यंत 60 गीगावॅट (जीडब्ल्यू) नवीकरणीय ऊर्जा  क्षमता स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

5 गीगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसह या महामंडळाची 17 गीगावॅटपेक्षा जास्त निर्माणाधीन क्षमता आहे.

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1747877) Visitor Counter : 645