उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी ओणम निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या
Posted On:
20 AUG 2021 5:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2021
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ओणम निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. संदेशाचा मजकूर पुढीलप्रमाणे -
“मी ओणमच्या पवित्र प्रसंगी आपल्या देशातील जनतेचे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
ओणम आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये कापणीच्या हंगामाची सुरुवात होत असल्याचे प्रतीक आहे आणि विपुल प्रमाणात असलेल्या निसर्गाची प्राणशक्ती आणि सौंदर्याचा आनंद साजरा करण्याची संधी आहे. केरळचा प्राचीन सण म्हणून ओणम् पौराणिक राजा महाबलीच्या स्मृतींच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. पारंपरिक खेळ, संगीत आणि नृत्य याचबरोबर 'ओनासदया' प्रीतिभोजनात आपल्या मित्रपरिवारासमवेत सहभागी होण्याची ही संधी आहे.
मी आपल्या देशवासियांना कोविड प्रतिबंधक आरोग्य आणि स्वच्छता नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन करतो. हा सण आपल्या देशात शांतता , समृद्धी आणि आनंद घेऊन येवो. ”
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747634)
Visitor Counter : 174