आदिवासी विकास मंत्रालय
जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ आणि कॅडेट संघांनी पटकावली सर्वाधिक 15 पदके
15 पदकांमध्ये 8 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांचा समावेश
दोन नवीन युवा विश्वविक्रम प्रस्थापित
Posted On:
17 AUG 2021 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2021
15 ऑगस्ट रोजी भारताने स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि 9 ते 15 ऑगस्ट, 2021 दरम्यान व्रोकला (पोलंड) येथे आयोजित जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी भारताच्या कनिष्ठ आणि कॅडेट तिरंदाजांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
भारतीय कनिष्ठ आणि कॅडेट संघानी 15 पदके जिंकली (8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कांस्य पदके)आणि युवकांसाठीच्या सर्वात मोठ्या स्पर्धेचा समारोप झाला. जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. कंपाउंड प्रकारात भारतीय तिरंदाजांनी 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली तर एकूण 520 तिरंदाजांचा सहभाग असलेल्या रिकर्व्हमध्ये भारतीय तिरंदाजांनी 5 सुवर्ण आणि 3 कांस्य पदकांना गवसणी घातली. व्रोकला आधी, भारतीय तिरंदाजांनी जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद /जागतिक कनिष्ठ (जुने नाव) स्पर्धेमध्ये एकूण 26 पदके (6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 11 कांस्य) जिंकली आहेत. मात्र एकट्या व्रोकलामध्ये जगातील 500 हून अधिक सहभागी तिरंदाजांमध्ये भारतीय युवा तिरंदाजांनी जिंकलेली 15 पदके आपल्या तिरंदाजांची यशोगाथा सांगतात.
24 पैकी 14 भारतीय युवा तिरंदाजांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला त्यामुळे ही स्पर्धा अन्य दृष्टीने महत्त्वपूर्ण होती. इतकेच नव्हे तर,सप्टेंबर 2021 मध्ये अमरिकेत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वरिष्ठ संघाचे सदस्य म्हणून पदके जिंकणाऱ्या पाच युवा तिरंदाजांची निवड करण्यात आली आहे.तिरंदाजांनी जागतिक विक्रमही प्रस्थापित केले.प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधुवर्शीनी सेंथिकुमार यांनी या कंपाऊंड कॅडेट मुलींच्या त्रिकुटाने दोन नवीन युवा विश्वविक्रमाची नोंद केली. या तिघींच्या चमूने संभाव्य 2160 गुणांपैकी 2067 गुण मिळवून कॅडेट कंपाउंड सांघिक विश्वविक्रम प्रस्थापित केला.यापूर्वी हा विश्वविक्रम 2045 गुण जिंकत अमेरिकेच्या नावावर होता. कंपाऊंड कॅडेट मिश्र दुहेरीत - प्रिया गुर्जर आणि कुशल दलाल यांनी 1440 संभाव्य गुणांपैकी 1401 गुणांची कमाई करत नवीन विश्वविक्रमाची नोंद केली. यापूर्वी यामधील जगातील सर्वोत्तम गुणसंख्या 1387 होती.
पोलंडमध्ये कनिष्ठ गटात रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर कोमलिका बारी ही दीपिका कुमारीनंतर कॅडेट आणि कनिष्ठ रिकर्व्ह ही दोन्ही महिला जागतिक अजिंक्यपद जिंकणारी दुसरी भारतीय ठरली.
कामगिरीचे ठळक मुद्दे
सांघिक कामगिरी -
कॅडेट कंपाऊंड तिरंदाजांनी तिन्ही सांघिक सुवर्णपदके जिंकली (मुलांचा संघ , मुलींचा संघ आणि मिश्र संघ )
कॅडेट रिकर्व्ह आणि कॅडेट कंपाऊंड तिरंदाजांनी सर्व 6 पदके (5 सुवर्ण आणि 1 कांस्य) प्रथमच जिंकली.
वैयक्तिक कामगिरी -
कोमलिका बारीने (21वर्षाखालील कनिष्ठ रिकर्व्ह) सुवर्णपदक जिंकले आणि दीपिका कुमारी नंतर कॅडेट आणि कनिष्ठ रिकर्व्ह या ही दोन्ही महिला जागतिक अजिंक्यपद जिंकणारी दुसरी भारतीय ठरली.
प्रिया गुर्जर (18 वर्षांखालील कॅडेट कंपाऊंड) एकूण तीन पदके (2 सुवर्ण+1 रौप्य) मिळवत कोणत्याही जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणारी पहिली भारतीय तिरंदाज बनली.नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या दोन्ही संघांत तिचा सहभाग होता.
बिशाल चांगमाई (18 वर्षांखालील कॅडेट रिकर्व्ह) कोणत्याही जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके आणि एका कांस्य पदकासह एकूण तीन पदके जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज ठरला.
साक्षी चौधरी (21 वर्षांखालील कनिष्ठ कंपाऊंड) गटात अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कनिष्ठ कंपाऊंड तिरंदाज बनली आणि तिच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी झाली.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746781)
Visitor Counter : 1010