खाण मंत्रालय
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जेएनएआरडीडीसी, नागपूरतर्फे “फिट इंडिया फ्रीडम रन आणि चित्रकला स्पर्धा
Posted On:
17 AUG 2021 5:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2021
खाण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, जेएनएआरडीसीने, "फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 -आझादी का अमृत महोत्सव "कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहाने आयोजन केले. कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग या आयोजनात होता. केंद्राच्या तांत्रिक संकुलाच्या परिसरातून सुरू झालेल्या 3 किलोमीटरच्या उद्घाटन दौडमध्ये सुमारे 55 कर्मचारी सहभागी झाले होते.
स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, संस्थेने 15 ऑगस्ट 2021 रोजी " स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव" या संकल्पनेवर कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली. जेएनएआरडीडीसीचे संचालक डॉ अनुपम अग्निहोत्री यांच्या हस्ते सुमारे 75 सहभागींना बक्षिसे देण्यात आली.
M.Chopade/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746726)
Visitor Counter : 391