उपराष्ट्रपती कार्यालय

75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 14 AUG 2021 5:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2021

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या  नायडू यांनी  देशवासियांना  शुभेच्छा दिल्या आहेत.संपूर्ण संदेश असा आहे-

स्वातंत्र्यदिनाच्या आनंददायी प्रसंगी देशवासियांचे माझ्याकडून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपण आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहोत, त्यानिमित्ताने  आपण आपल्या संस्थापक नेत्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करूया, ज्यांनी आपल्या देशाला  स्वातंत्र्य मिळवून दिले आणि  त्यांच्या स्वप्नांतील भारताच्या उभारणीसाठी झटण्याचा संकल्प केला.

या महत्त्वाच्या प्रसंगी, आपण हे देखील लक्षात ठेवूया की आपल्या राष्ट्राची प्रगती आणि कल्याण यांचा आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला विकासाचे फायदे आणि सन्माननीय जीवन सुनिश्चित करण्यावर प्रभाव पडतो. आपल्या 'विचारांचे आदानप्रदान  आणि एकमेकांची देखभाल ' या सांस्कृतिक मूल्यामागचा मूलभूत विश्वास आहे. ‘आपल्या सर्व नागरिकांसाठी सुरक्षितता - न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व’ हा  उदात्त घटनात्मक आदर्श साध्य करण्यासाठी आपण एकत्र काम करायला हवे.

स्वातंत्र्यदिनाच्या या आनंदाच्या प्रसंगी, आपण पुन्हा एकदा आपल्या आंतरिक सामर्थ्यांचा पुन्हा शोध घेण्यासाठी, आपल्या लोकांच्या अफाट क्षमतेची जाणीव करण्यासाठी आणि भारताला विविध राष्ट्रांच्या समुदायामध्ये  योग्य स्थान मिळवून देण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा पुन्हा संकल्प करूया,असे या संदेशात म्हटले आहे.

 

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745833) Visitor Counter : 186