पर्यटन मंत्रालय

अमृत महोत्सवाचा भाग म्हणून सहभागींना आभासी माध्यमातून अतुल्य भारताचा प्रवास घडवणाऱ्या 12 भागांची मालिका पर्यटन मंत्रालय सुरू करणार


उद्घाटनाच्या कार्यक्रमात 20 मिनिटांचा चित्रपट- 'इंडिया@75-अ जर्नी' चे थेट प्रक्षेपण होईल

Posted On: 13 AUG 2021 8:42PM by PIB Mumbai

 

ठळक मुद्दे :

  • भारतीय विद्यापीठ संघटनेच्या  (एआययू) सहकार्याने सहभागींना आभासी माध्यमातून अतुल्य भारताचा प्रवास घडवणाऱ्या 12 भागांची मालिका पर्यटन   मंत्रालय सुरू करणार
  • चित्रपटावर आधारित प्रश्नमंजुषेसह  'इंडिया@75-अ जर्नी' चित्रपट प्रक्षेपित केला जाईल

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, शनिवार,14 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1:30 वाजता पर्यटन मंत्रालय भारतीय विद्यापीठ संघटनेच्या सहकार्याने (एआययू) सहभागींना आभासी माध्यमातून अतुल्य भारताचा प्रवास घडवणारी १२ भागांची मालिका सुरू करणार आहे. केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री श्री.जी किशन रेड्डी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.केंद्रीय शिक्षण मंत्री आणि कौशल्य विकास आणि उद्यमशीलता  मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान जी या कार्यक्रमाचे आदरणीय मुख्य अतिथी आहेत.

 

उद्घाटनाच्या कार्यक्रमात इंडिया@75-अ जर्नीनावाच्या 20 मिनिटांच्या चित्रपटाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. कार्यक्रम संपल्यानंतरवेबिनार दरम्यान दाखवलेल्या चित्रपटावर आधारित प्रश्नमंजुषेत सहभागी भाग घेऊ शकतात. प्रश्नमंजुषेसाठीचा दुवा प्रसिद्धिपत्रकाच्या शेवटी देण्यात आला आहे.आणि वेबिनार संपल्यानंतर 3 तासांच्या कालावधीसाठी ही प्रश्नमंजुषा खुली राहणार आहे. सहभागींना "सर्वात वेगवान" 1000 विजेत्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि अनोखी  बक्षिसे दिली जातील.दुपारी दीड वाजता वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी आणि वेबिनार नंतर   प्रश्नमंजुषेत भाग घेण्यासाठी स्वतंत्र दुवे शेवटी नमूद केले आहेत.

14 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1:30 वाजता कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी होण्यासाठी दुवा:

https://digitalindia-gov.zoom.us/j/93312769334

Passcode: 900336

वेबिनारनंतर प्रश्नमंजूषेत  3 तासांच्या आत सहभागी होण्यासाठी दुवा : (* नियम आणि अटी लागू)

https://quiz.mygov.in/quiz/india75-a-journey/

अतुल्य भारतसाठी फॉलो करा

फेसबुक  - https://www.facebook.com/incredibleindia/

इंस्टाग्राम  - https://instagram.com/incredibleindia?igshid=v02srxcbethv

***

M.Chopade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1745599) Visitor Counter : 255


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali