वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

इंडिया@75 हा नवी स्वप्ने, नवी ऊर्जा आणि नव्या वचनबद्धतेसह एका नव्या भारताचा जाहीरनामा- पीयूष गोयल


केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांचे सीआयआयच्या ‘ सरकार आणि व्यवसाय यांच्यात शाश्वत विकासासाठी ताळमेळ’ या विषयावरील आभासी परिषदेत मार्गदर्शन

Posted On: 12 AUG 2021 10:02PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणीज्य आणि उद्योगमंत्री पीयूष  गोयल यांनी आज भारतीय उद्योग महासंघाच्या( सीआयआय) वार्षिक शिखर परिषदेत सरकार आणि व्यवसाय यांच्यात शाश्वत विकासासाठी ताळमेळया विषयावरील विशेष सत्राला संबोधित केले. इंडिया@75 : सरकार आणि व्यवसाय आत्मनिर्भर भारतासाठी एकत्र काम करत आहेतही या वर्षाच्या वार्षिक बैठकीची संकल्पना होती. या सत्रामध्ये बोलताना पीयूष  गोयल म्हणाले की 75 वर्षांपूर्वी आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काम केले आणि आता आपण आत्मनिर्भर बनण्यासाठी एका मोहिमेप्रमाणे काम केलेच पाहिजे.

आपल्या देशाला गतिमान वृद्धी, विकास आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्याची अभूतपूर्व संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. 75व्या वर्षात आपल्याला आपण कुठपर्यंत आलो आहोत आणि पुढचा प्रवास किती आहे ते पाहिले पाहिजे. आजादी का अमृतमहोत्सव ही 130 कोटी भारतीयांना कृतीशील होण्यासाठी दिलेली साद आहे आणि 130 कोटी  हा केवळ एक आकडा नसून 130 कोटी शक्यता आहेत. हा आपल्या अगणित क्षमतांच्या स्रोतांचा अतिशय आगळा वेगळा निर्देशांक आहे, याकडे गोयल यांनी लक्ष वेधले.

आम्ही आत्मनिर्भर भारतासाठी जन-भागीदारी आणि उद्योग भागीदारीकडे पाहात आहोत, असे ते म्हणाले. भारताचे तरुण हे भविष्याचे मशालवाहक आहेत, असे गोयल यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा समारोप करताना गोयल म्हणाले की उत्पादन क्षेत्राच्या पाठबळावर सेवा क्षेत्राची वाटचाल सुरू आहे. भारतासारख्या विशाल आकारमानाच्या आणि क्षमतेच्या देशासाठी उत्पादन क्षेत्र एक महत्त्वाचे क्षेत्र आहे, असे गोयल यांनी सांगितले. भारतात कौशल्य निर्मितीला चालना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उद्योग क्षेत्राला केले. व्यवसाय आणि सरकार यामध्ये ताळमेळ वाढवण्यासाठी आणखी जास्त जबाबदारी घेण्याचे आणि पावले उचलण्याचे आवाहन वाणीज्यमंत्र्यांनी सीआयआयला केले.

***

M.Chopade/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1745293) Visitor Counter : 348


Read this release in: Hindi , English , Urdu , Tamil