PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 12 AUG 2021 5:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई 12 ऑगस्ट 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 52.36 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • Active cases constitute 1.21% of total cases; lowest since Mar 2020
  • India's Active caseload currently 3,87,987
  • Highest ever Recovery Rate achieved; currently at 97.45%
  • 3,12,60,050total recoveries across the country so far
  • 39,069patients recovered during last 24 hours
  • India reports 41,195new cases in last 24 hours
  • Weekly Positivity Rate remainsbelow5%, currently at 2.23%
  • Daily positivity rate at 1.94%; less than 3% for last 17 days
  • Testing capacity substantially ramped up – 48.73crore tests conducted(Total)

 

 

 

 

 

 

 

 

#Unite2FightCorona#IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

 

Image

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी 52 कोटींचा मोठा टप्पा ओलांडला आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 59,97,068 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 52,36,71,019 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 44,19,627 मात्रा देण्यात आल्या.
या मात्रांमध्ये खालील मात्रांचा समावेश आहे:

 

HCWs

1st Dose

1,03,41,119

2nd Dose

80,34,194

FLWs

1st Dose

1,82,48,485

2nd Dose

1,19,35,584

Age Group 18-44 years

1st Dose

18,47,82,179

2nd Dose

1,34,26,569

Age Group 45-59 years

1st Dose

11,40,17,033

2nd Dose

4,40,01,065

Over 60 years

1st Dose

7,95,91,513

2nd Dose

3,92,93,278

Total

52,36,71,019

 


देशात 21 जून 2021 पासून कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला. संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

भारतातील रोगमुक्ती दर आता 97.45% झाला आहे. महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत भारताने गाठलेला हा सर्वोच्च रोगमुक्ती दर आहे.

देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,12,60,050 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासात 39,069 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले.

 


भारतात गेल्या 24 तासात, दैनंदिन पातळीवर 41,195 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग सेहेचाळीस दिवस 50,000 हून कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 


भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 3,87,987 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या फक्त 1.21% इतके आहे आणि मार्च 2020 पासूनचे हे सर्वात नीचांकी प्रमाण आहे.
 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासात देशात एकूण 21,24,953 चाचण्या करण्यात आल्या. देशात कोविड महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकंदर 48 कोटी 73 लाखांहून अधिक (48,73,70,196) चाचण्या करण्यात आल्या.

देशभरात एकीकडे कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.23% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.94% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 17 दिवस 3% हून कमी आहे आणि गेले सलग 66 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

***

 

इतर अपडेटस्

Important Tweets

 

***

M.Chopade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745288) Visitor Counter : 146


Read this release in: English , Hindi , Punjabi , Gujarati