अर्थ मंत्रालय

सार्वजनिक उपक्रम विभागाकडून 60 वे वार्षिक सार्वजनिक आस्थापना सर्वेक्षण 2019-20 जारी

Posted On: 11 AUG 2021 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2021

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचा सार्वजनिक उपक्रम विभाग केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांच्या कामगिरीवर आधारित वार्षिक सार्वजनिक क्षेत्र उपक्रम सर्वेक्षणजारी करते.  सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण 2019-20 लोकसभेत 6 ऑगस्ट 2021 ला तर 9 ऑगस्ट 2021ला राज्य सभेत सादर करण्यात आले.

सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण 2019-20 हे या मालिकेतले  साठावे सर्वेक्षण आहे. सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षणात, सर्व केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाचा, विविध वित्तीय आणि भौतिक निकषांवर आवश्यक आकडेवारी गोळा केली जाते. या सर्वेक्षणात कृषी, खाण आणि उत्खनन,निर्मिती, प्रक्रिया आणि निर्मिती, सेवा आणि निर्माणाधिन उपक्रम  अशी पाच गटात विभागणी केली जाते आणि त्यानंतर आणखी 21 गटात विभागणी केली जाते. ज्या उपक्रमात सरकारचे  50 % हून अधिक भाग भांडवल आहे अशा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाचा सर्वेक्षणात समावेश केला जातो. या कंपन्यांच्या उप कंपन्या , ज्यामध्ये  सरकारचे  50 % हून अधिक भाग भांडवल आहे अशांचाही समावेश यामध्ये करण्यात येतो.

सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण 2019-20 नुसार 31 मार्च 2020 ला 256 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम कार्यरत आहेत.

ठळक वैशिष्ट्ये :-

  • सर्व केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांचे 31.3.2020 रोजी एकूण भाग भांडवल 3,10,737 कोटी आहे.
  • सर्व केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांत एकूण वित्तीय गुंतवणूक 21,58,877 कोटी आहे.
  • 2019-20 या वित्तीय वर्षात 256 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम परीचालनातून 24,61,712 कोटी रुपयांचा ढोबळ महसूल
  • 2019-20 या वित्तीय वर्षात, नफ्यात असलेल्या  171 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाचा नफा 1,38,112   कोटी रुपये.
  • 2019-20 या वित्तीय वर्षात, तोट्यात असलेल्या  84 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाचा तोटा 44,817 कोटी रुपये.
  • 31 मार्च 2020 ला  केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाची गंगाजळी आणि अतिरिक्त या वर्गवारीत 9,57,579 कोटी रुपये
  • 31 मार्च 2020 ला  केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाची एकूण संपत्ती 12,35,706 कोटी रुपये.
  • 2019-20या वित्तीय वर्षात 105 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमानी 72,136 कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केला/दिला.
  • केंद्रीय तिजोरीत अबकारी कर, सीमाशुल्क कर, वस्तू आणि सेवा कर, केंद्र सरकारच्या कर्जावरील व्याज, लाभांश आणि इतर कर स्वरुपात, सर्व  केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाचे  2019-20 या वित्तीय वर्षात 3,76,425 कोटी रुपये योगदान राहिले.

तपशीलवार सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण अहवाल 2019-20 इथे पाहता येईल- https://dpe.gov.in/.

 

Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1744863) Visitor Counter : 430