अवजड उद्योग मंत्रालय

ईईएसएल/ सीईएसएल मार्फत देशातल्या 49 शहरांत 160 पेक्षा जास्त केंद्रीय आणि राज्य सरकारी कार्यालयांमध्ये 1590 इलेक्ट्रिक वाहने तैनात

Posted On: 09 AUG 2021 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2021

 

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील, ऊर्जा क्षमता सेवा लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, कनव्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (CESL –EESL च्या 100% मालकीची उपकंपनी) ई- वाहतूक उपक्रम राबवत आहे. तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहन उत्पादनांना चालना देण्यासह, पायाभूत सुविधा कंपन्या, परिवहन व्यावसायिक, सेवा पुरवठादार अशा सर्वांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.या अंतर्गत, कार्यक्षमता वाढवणे,खर्च कमी करणे, स्थानिक उत्पादन सुविधा निर्माण करणे, इलेक्ट्रिक वाहन उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी ,तंत्रज्ञान विषयक कार्यक्षमता वाढवणे आणि या सर्व उपाययोजनांच्या आधारे इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना जागतिक स्तरावर पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्याचे काम या अंतर्गत केले जात आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत, ईईएसएल/सीईएसएल ने विविध श्रेणीतील इलेक्ट्रिक कार्सची खरेदी स्पर्धात्मक लिलाव पद्धतीद्वारे नुकतीच पूर्ण केली. आतापर्यंत ईईएसएल/सीईएसएलने देशातील 49 शहरांत 160 केंद्रीय आणि राज्य सरकारी कार्यालयांमध्ये 1590 इलेक्ट्रिक वाहने तैनात केली आहेत अथवा तैनात करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यापूर्वी भाडेतत्वावर घेतलेल्या सध्या वापरात असलेल्या पेट्रोल/डिझेल वाहनांच्या जागी वापरण्यासाठी या ई-कार्स भाड्याने/ थेट खरेदी प्रक्रियेद्वारे दिल्या जात आहेत.

ईईएसएल/सीईएसएल इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याच्या पायाभूत सुविधा देखील विकसित करत असून, त्यासाठी, महापालिका, वीज वितरण कंपन्या, यांच्याशी संबंधित विविध हितसंबंधी गटांशी करारही करण्यात आला आहे. या करारान्वये, संबंधित भागात चार्ज करण्याच्या पायाभूत सुविधा, उभारण्यासाठी काम सुरु आहे. ईईएसएल/सीईएसएलने 301 इलेक्ट्रिक वाहन चार्जर उभारले आहेत.

महाराष्ट्रासह, तेरा राज्यांत इलेक्ट्रिक वाहने धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे किंवा त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एनटीपीसी ने उभारलेल्या चार्जिंग स्टेशन्सची माहिती, परिशिष्ट दोन मध्ये जोडण्यात आली आहे.

केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुज्जर यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

ANNEXURE-I

Details of Charging Stations installed (As on 06-07-2021)

 

City

Charging Stations

Highway

Charging Stations

Chandigarh

48

Delhi -Chandigarh

24

Delhi

94

Mum-Pune

15

Rajasthan

49

Delhi- Jaipur- Agra

29

Karnataka

45

Jaipur-Delhi Highway

9

Jharkhand

29

 

 

Goa

19

 

 

Telangana

50

 

 

Uttar Pradesh

11

 

 

Himachal Pradesh

7

 

 

Total

352

 

77

ANNEXURE-II

 

Details of Public Charging Stations installed by CPSUs under Ministry of Power

 

EESL

NTPC

PGCIL

State

No. of PCS installed

State

No. of PCS installed

State

No. of PCS installed

Chhattisgarh

2

Haryana

4

Gujarat

2

Delhi

73

Uttar Pradesh

16

Karnataka

2

Goa

1

Delhi

42

Delhi

4

Gujarat

0

Madhya Pradesh

12

Haryana

1

Haryana

2

Andhra Pradesh

2

Telangana

6

Karnataka

1

Telangana

2

Kerala

2

Kerala

7

Tamil Nadu

8

-

-

Maharashtra

2

Kerala

2

-

-

Tamil Nadu

20

Gujarat

4

-

-

Uttar Pradesh

21

Karnataka

8

-

-

West Bengal

18

-

-

-

-

Total

147

 

100

 

17

 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1744147) Visitor Counter : 250