पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
एलएनजीचा वापर वाढवणे आणि त्याचे वितरक बनणे यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना
Posted On:
09 AUG 2021 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2021
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, देशात एलएनजीचा वापर करायला आणि त्याचे वितरक बनायला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे . यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
- औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना एलएनजीसह नैसर्गिक वायूच्या वाढीव पुरवठ्यासाठी सीजीडी नेटवर्कला प्रोत्साहन.
- खत (युरिया) क्षेत्रात गॅसचे पूलिंग.
- एलएनजी टर्मिनल्सची स्थापना/क्षमता वाढवणे, एलएनजी पुन्हा वायुरूपात आणणे
- राष्ट्रीय महामार्ग, सुवर्ण चतुर्भुज इत्यादींवर एलएनजी केंद्र उभारण्यास प्रोत्साहन देणे.
- नियामक सहाय्य उदा . केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR), स्थिर आणि मोबाईल प्रेशर वेसल नियम (SMPV), एलएनजी वाहन प्रकार चाचणी मानक, डिझेल- एलएनजी दुहेरी इंधन वाहन धोरण इत्यादीत सुधारणा सरकारने लागू केल्या आहेत.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1744101)