संरक्षण मंत्रालय

स्वदेशी बनावटीचे विमानवाहक ‘विक्रांत’जहाजाचा पहिला सागरी प्रवास यशस्विरीत्या पूर्ण

Posted On: 08 AUG 2021 8:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2021

स्वदेशी बनावटीच्या विमानवाहक ‘विक्रांत’ जहाजाने (IAC) आज आपली पहिली सागरी यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली. 4 ऑगस्ट 21 रोजी विक्रांत कोचीहून निघाले होते. नियोजन केल्याप्रमाणे या जहाजाने चाचणीत  प्रगती केली आणि प्रणालीचे मापदंड समाधानकारक मिळाले. जहाज भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यापूर्वी सर्व उपकरणे आणि यंत्रणा यशस्वी पणे सिद्ध करण्यासाठी समुद्रातील त्याच्या  चाचण्यांची मालिका सुरूच रहाणार आहे.

भारतीय नौदलाच्या, नौवहन रचना संचालनालयाने (डीएनडी) रचना केलेले स्वदेशी विमानवाहक जहाज 'विक्रांत' ची (आयएसी) बांधणी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम 'कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल)' येथे केली जात आहे. 76% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह तयार केलेले आयएसी हे राष्ट्राच्या  "आत्मनिर्भर भारत" आणि भारतीय नौदलाच्या "मेक इन इंडिया" या संशोधन उपक्रमांचे एक प्रमुख उदाहरण आहे.

हे स्वदेशी विमानवाहक जहाज 262 मीटर लांब, 62 मीटर रुंद आणि 59 मीटर उंच आहे. यावर एकूण 14 डेक आहेत, ज्यात पाच सुपरस्ट्रक्चर्स आहेत. या जहाजामध्ये 2,300 पेक्षा जास्त कंपार्टमेंट्स आहेत, जे सुमारे 1700 लोकांच्या समुद्र पर्यटनासाठी निर्माण केले आहेत, ज्यात महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र सोय आहे. मशीनरी ऑपरेशन, जहाज नेव्हिगेशन आणि टिकाऊपणासाठी उच्च पातळीचे स्वयंचल (ऑटोमेशन) असलेल्या जहाजाच्या रचनेत निश्चित विंग आणि रोटरी विमानासाठी वर्गीकरणासाठी केलेल्या जागा आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनी म्हणजेच 'आझादी का अमृत महोत्सव' प्रसंगी विक्रांतचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे.

 

 

 

 

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1743869) Visitor Counter : 354