सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
डॉ. विरेन्द्र कुमार यांच्या हस्ते “पीएम- दक्ष” पोर्टल आणि “पीएम-दक्ष” मोबाईल अॅपचे उद्घाटन
“पीएम- दक्ष” पोर्टल च्या माध्यमातून अनुसूचित जाती, मागास वर्गीय आणि सफाई कामगारांना कौशल्य विकासाशी संबंधीत सर्व माहिती एकाच जागी उपलब्ध होईल
Posted On:
07 AUG 2021 9:03PM by PIB Mumbai
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ विरेन्द्र कुमार यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘पीएम-दक्ष’ पोर्टल आणि ‘पीएम-दक्ष’ या मोबाईल अॅपचे उद्घाटन झाले. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने एनइजीडी च्या सहकार्याने हे पोर्टल आणि अॅप विकसित केले आहे. या पोर्टल आणि अॅपमुळे लक्ष्यीत गटातील युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती सहजगत्या उपलब्ध होऊ शकेल.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, प्रधानमंत्री दक्षता आणि कुशलता संपन्न हिताग्रही ( पीएम-दक्ष) योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकार वर्ष 2020-21 पासून करत आहे.
आता कुठल्याही व्यक्तीला ‘पीएम-दक्ष’ या पोर्टल किंवा अॅपवरून, कौशल्य विकासाशी सबंधित सर्व माहिती केवळ एका क्लिकवर बघता येईल. तसेच, एकाच क्लिकवर, या अंतर्गत सुरु असलेल्या सर्व प्रशिक्षणांची माहिती देखी मिळू शकेल. त्यांच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु असेल, त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी तो/ती सहज या पोर्टल अथवा अॅपवरून नोंदणी करू शकतील.
पीएम-दक्ष पोर्टल http://pmdaksh.dosje.gov.in वर उपलब्ध आहे. तर पीएम-दक्ष मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करता येईल.
“आज या पोर्टल आणि मोबाईल अॅपचे उद्घाटन करतांना मला अत्यंत आनंद होत आहे.’ अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी दिली.
या पोर्टलची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
या पोर्टलवर, मागासवर्ग, अनिसूचित जाती आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या मंत्रालयाच्या योजनांची माहिती एकाच जागी मिळू शकेल.
युवक-युवतींना त्यांच्या आवडीप्रमाणे, हव्या त्या प्रशिक्षण संस्थेत आणि प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याची सुविधा.
वैयक्तिक माहिती शी सबंधित आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा.
उपलब्ध माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात, लक्ष्यीत गटांपैकी 2,73,152 लोकांना आतापर्यंत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे. वर्ष 2021-22 मध्ये सुमारे 50,000 लोकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
***
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1743717)
Visitor Counter : 367