पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून खुला एकरी परवाना कार्यक्रम बोली फेरी-VI ची सुरुवात


गुंतवणूकदारांना सुमारे 35,346 चौरस किमी क्षेत्राचा प्रस्ताव

Posted On: 06 AUG 2021 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑगस्‍ट 2021

 

मार्च 2016 मध्ये हायड्रोकार्बन शोध आणि परवाना धोरणाच्या (HELP)  प्रारंभामुळे भारतात शोधित क्षेत्राच्या  लिलाव करण्याच्या पद्धतीत  बदल घडवून आणले. यामुळे उत्पादन सामायिकीकरण  पद्धतीतून  महसूल सामायिकीकरण  व्यवस्थेत संक्रमण झाले. खुल्या एकरी परवाना कार्यक्रमामुळे  (OALP)  संभाव्य गुंतवणूकदारांना एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) सादर करून त्यांच्या आवडीचे क्षेत्र  तयार करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. लिलावाच्या ३ फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये हायड्रोकार्बन शोध आणि परवाना धोरणाच्या (HELP) कक्षेत आणखी  धोरणात्मक सुधारणा अधिसूचित केल्या. 'महसुला' वरून 'उत्पादन वाढीवर' अधिक लक्ष्य केंद्रित करण्यात आले. 

नवी दिल्ली येथे 30 जुलै 2021 रोजी आयोजित शोध आणि उत्पादन( E&P) गुंतवणूकदारांच्या बैठकीत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी  खुल्या एकरी परवाना कार्यक्रम (OALP) बोली फेरी- VI  लवकरच सुरू होत असल्याची घोषणा केली होती आणि देशी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला  भारतीय ऊर्जा विकासगाथेत  सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले  होते.

त्यानुसार शोध आणि उत्पादन( E&P) गतिविधी वाढवण्यावर लक्ष्य  केंद्रित करत, सरकारने आता 6 ऑगस्ट, 2021 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक निविदेसाठी ओएएलपी बोली फेरी VI सुरू केली आहे.  अंदाजे क्षेत्रफळ 35,346 चौरस किमी असलेल्या 21 क्षेत्रांचा प्रस्ताव  गुंतवणूकदारांपुढे ठेवण्यात आला आहे. निविदाकार  6 ऑगस्ट, 2021 पासून ऑनलाईन ई-बिडिंग पोर्टलद्वारे आपली बोली सादर करू शकतील आणि बोली सादर करण्याची अंतिम मुदत 6 ऑक्टोबर 2021 च्या  12 वाजेपर्यंत आहे. कोविड 19 ची स्थिती विचारात घेऊन आवश्यक कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करण्याची परवानगी आहे. विजेत्या बोलीदारांना या क्षेत्रांचे  वाटप नोव्हेंबर 2021 च्या अखेरपर्यंत अपेक्षित आहे.

हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी (HELP) विषयी - 

हायड्रोकार्बन शोध आणि परवाना धोरणा (हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी HELP),  महसूल सामायिकीकरण कंत्राट प्रारूपाचा स्वीकार करणारे असून, भारतीय शोध आणि उत्पादन (E&P) क्षेत्रात व्यवसाय सुलभता  सुधारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. हे आकर्षक आणि उदारमतवादी आणि सुलभ, पारदर्शी आणि जलद बोली आणि प्रदान प्रक्रिया अंगीकारणारे आहे. 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने भारतातील  17 पेक्षा अधिक खोऱ्यांमध्ये  सुमारे 1,56,580 चौरस किमी क्षेत्रामध्ये 105 क्षेत्रे प्रदान केली, ज्यात  सुमारे 2,378 दशलक्ष डॉलर्सची एकूण गुंतवणूक आकर्षित झाली. 

Details of Blocks on Offer (OALP Bid Round-VI)

(Pertaining to EoI Cycle-VIII)

S. No.

NAME Of BLOCK

AREA (sq. km.)

STATE NAME

BASIN

ONLAND/ OFFSHORE

1

CB-ONHP-2020/1

44.13

Gujarat

Cambay

Onland

2

AA-ONHP-2020/1

557.33

Tripura

Assam Arakan Fold Belt

Onland

3

AA-ONHP-2020/2

50.41

Tripura

Assam Arakan Fold Belt

Onland

4

AA-ONHP-2020/3

219.37

Tripura

Assam Arakan Fold Belt

Onland

5

CD-ONHP-2020/1

3,305.89

Andhra Pradesh

Cuddapah

Onland

6

NM-ONHP-2020/1

2,999.15

Madhya Pradesh and Maharashtra

Narmada

Onland

7

MB-OSHP-2020/1

956.1

Western Offshore

Mumbai Offshore

Offshore

8

MB-OSHP-2020/2

427.17

Western Offshore

Mumbai Offshore

Offshore

9

AN-UDWHP-2020/1

3,995.25

Eastern Offshore

Andaman Nicobar

Offshore

10

AN-UDWHP-2020/2

9,650.12

Eastern Offshore

Andaman Nicobar

Offshore

 

Total

22,204.92

 

 

 

 

(Pertaining to EoI Cycle -IX)

S. No.

NAME Of BLOCK

AREA (sq. km.)

STATE NAME

BASIN

ONLAND/ OFFSHORE

1

CB-ONHP-2021/1

113.74

Gujarat

Cambay

Onland

2

CB-ONHP-2021/2

28.59

Gujarat

Cambay

Onland

3

GK-ONHP-2021/1

313.64

Gujarat

Kutch

Onland

4

GS-ONHP-2021/1

2,483.64

Gujarat

Saurashtra

Onland

5

GV-ONHP-2021/1

308.32

Bihar

Ganga Punjab

Onland

6

GV-ONHP-2021/2

302.57

Uttar Pradesh and Bihar

Ganga Punjab

Onland

7

BP-ONHP-2021/1

2,872.56

West Bengal

Bengal Purnea

Onland

8

AA-ONHP-2021/1

37.68

Tripura

Assam Arakan Fold Belt

Onland

9

AS-ONHP-2021/1

24.64

Assam

Assam Shelf

Onland

10

CB-OSHP-2021/1

472.56

Western Offshore and Gujarat

Cambay

Offshore

11

MB-OSHP-2021/1

6,183.17

Western Offshore

Mumbai Offshore

Offshore

 

Total

13,141.11

 

 

 

 

 

 

Summary of Blocks awarded in OALP Bid Round-I, II, III, IV and V

MoPNG awarded 105 Blocks spanning to an area of around 156,580 sq. km. in over 17 Sedimentary Basins of India which attracted total committed investment of around USD 2,378 million.

S. No.

Awardee's Name

Numbers of Blocks

Area (Sq. Km)

1

Vedanta Ltd.

51

58,584.95

2

Oil India Ltd.

25

49,160.95

3

ONGC Ltd.

24

46,380.69

4

BP+RIL

1

1,513.90

5

IOCL

1

474.19

6

GAIL

1

212.27

7

BPRL

1

173.71

8

HOEC Ltd.

1

79.21

 

 

105

156,579.87

 

 

* * *

M.Chopade/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1743375) Visitor Counter : 343


Read this release in: English , Hindi , Bengali , Telugu