नागरी उड्डाण मंत्रालय

हवाई वाहतूक क्षेत्राच्या सुधारणेसाठी अत्याधुनिक उपाय योजना

Posted On: 05 AUG 2021 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021

देशातील हवाई वाहतूक क्षेत्राच्या सुधारणेसाठी सरकार आतापर्यंत अत्याधुनिक उपाय योजना करत आले असून तसे ते यापुढेही करत राहणार आहे. त्या सुधारणा खालीलप्रमाणे आहेत :

  1. डिजी यात्रा प्रणालीबाबतचे धोरण नागरी उड्डाण मंत्रालयाने ऑगस्ट 2018 साली जाहीर केले होते. या प्रणालीद्वारे विमानतळावरील प्रवाशांना प्रवेश द्वारापासून ते विमानात चढेपर्यंत कागदविरहित, स्पर्शविरहित व विनात्रास सेवा मिळू शकेल. बंगळुरू, हैद्राबाद, कोलकाता, पुणे, वाराणसी आणि विजयवाडा या ६  विमानतळांवर चेहेरा ओळख तंत्रज्ञान वापरून बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणाली(BBS ) कार्यरत करण्यासाठी काम देण्यात आले आहे. हा प्रकल्प  सध्या चाचणी स्तरावर आहे. तो यशस्वीरीत्या  पूर्ण  झाल्यावर देशातील इतर विमानतळांवरही तो टप्प्याटप्प्याने  लागू केला जाईल. 
  2. भारतीय विमानतळ प्राधिकरणाची  (AAI ) येत्या 4-5 वर्षांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या विमानतळाचा विस्तार  व नवीन विमानतळाच्या विकासाच्या कामासाठी 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. 
  3. हवाईमार्ग दिशानिर्देश यंत्रणेचे आधुनिकीकरण केले जात आहे.
  4. हवाई वाहतूक प्रवाहाचे आधुनिक पद्धतीनुसार व्यवस्थापन करून कमीत कमी लांबीचे वायुमार्ग विकसित करून इंधनाची बचत करण्यासाठी सुयोग्य  हवाई मार्गाच्या आखणीचे काम भारतीय वायुसेनेच्या सहकार्याने सुरु आहे.
  5. हवाई मालवाहतुकीच्या कामातील वेळ वाचवण्यासाठी मालवाहतूक टर्मिनल्स वर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
  6. नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) आणि नागरी उड्डाण सुरक्षा संस्था (BCAS) यांच्या बहुतेक सर्व हितसंबंधीयांच्या परस्पर व्यवहारांसाठी व अंतर्गत प्रक्रियांसाठी इ- गव्हर्नन्स लागू केला जात आहे.
  7. देशात परवानाधारक विमानचालकांची संख्या वाढवण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA)ऑनलाईन ‘मागणीनुसार परीक्षा’ घेण्याची योजना बनवत आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल डॉ व्ही के सिंग (निवृत्त) यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तरात वरील माहिती दिली.  

 

Jaydevi PS/U.Raikar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1742920) Visitor Counter : 229


Read this release in: English , Urdu , Tamil , Malayalam