ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
दुहेरी इंजिन असलेल्या सरकारने हे सुनिश्चित केले आहे की गरीब, दलित, मागास, आदिवासींसाठी बनवलेल्या योजना उत्तर प्रदेशात त्वरित अंमलात आणल्या जातील: पंतप्रधान
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2021 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
महामारीबाबत बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की पूर्वी जेव्हा देशावर याच्यासारखे मोठे संकट आले होते, तेव्हा देशातील सर्व व्यवस्था वाईट रीतीने प्रभावित झाल्या होत्या. मात्र आज भारतात, प्रत्येक नागरिक संपूर्ण शक्तीनिशी या महामारीचा सामना करत आहे. शतकातून एकदा येणाऱ्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी विस्तृत माहिती दिली.
पंतप्रधान म्हणाले की, दुहेरी इंजिन असलेल्या सरकारने हे सुनिश्चित केले आहे की गरीब, दलित, मागास, आदिवासींसाठी बनवलेल्या योजना जलद गतीने अंमलात आणल्या जातील. पंतप्रधानांनी महामारीत उदभवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रभावी धोरणाने अन्नपदार्थांची किंमत नियंत्रणात ठेवली, शेतकऱ्यांना बियाणे किंवा खतांचा पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या, त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन दिले आणि सरकारने देखील किमान हमी भावाने विक्रमी खरेदी केली.
महामारीमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे गरीब आणि गरजूंना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एनएफएसए) अंतर्गत समाविष्ट साधारणपणे 80 कोटी लाभार्थ्यांना वितरित केले जाणारे मासिक अन्नधान्याचे प्रमाण दुपटीने वाढवले. अंत्योदय अन्न योजना (एएवाय)/ प्राधान्यकुटुंबांच्या शिधापत्रिका (म्हणजे, प्रत्येक AAY कुटुंबाला 35 किलो आणि प्रत्येक PHH व्यक्तीला 5 किलो )धारकांच्या सामान्य एनएफएसए पात्रतेव्यतिरिक्त दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य विनामूल्य प्रदान केले. सुरुवातीला, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत हा अतिरिक्त विनामूल्य लाभ तीन महिन्यांच्या कालावधीसाठी (म्हणजे एप्रिल ते जून 2020) देण्यात आला होता. मात्र महामारीचे संकट सुरूच राहिल्यामुळे हा कार्यक्रम आणखी पाच महिन्यांसाठी (म्हणजे जुलै ते नोव्हेंबर 2020) वाढविण्यात आला. महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या प्रारंभानंतर, पीएम-जीकेएवाय पुन्हा दोन महिन्यांच्या कालावधीसाठी (म्हणजे मे आणि जून 2021)सुरु करण्यात आली आणि आणखी पाच महिन्यांच्या कालावधीसाठी (म्हणजे जुलै ते नोव्हेंबर 2021) वाढवण्यात आली.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1742887)
आगंतुक पटल : 269